

Nashik Guardian Minister : दीड वर्ष रेंगाळलेल्या पालकमंत्री पदाचा निर्णय आज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू गिरीश महाजन यांना मोठी संधी दिली. यातून राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतूनच राजकीय धक्का देखील बसला.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री वादावरून गेले दीड वर्ष महायुतीत वाद होता. गिरीश महाजन यांचे नाशिकच्या तर आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त केले होते. मात्र अंतर्गत दबावामुळे मुख्यमंत्री परदेशात असतानाच त्यांना हा निर्णय स्थगित करावा लागला होता.
गेले दीड वर्ष पालकमंत्री पदावरून धमाल सुरू होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आपला अधिकार सांगितला होता. त्यासाठी भरत गोगावले यांनी जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले होते.
नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांनी स्थगिती मिळाल्यानंतरही आत्मविश्वासाने सर्व कारभार हाकला होता. भाजपच्या नेत्यांनी गिरीश महाजन हेच पालकमंत्री हा आत्मविश्वास वारंवार व्यक्त केला होता. अखेर भाजपने ते करून दाखवले.
नाशिक जिल्ह्यात 15 पैकी सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदावर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील इच्छुक होते. त्यासाठी उघडपणे आणि पडद्यामागून जोरदार फील्डिंग लावण्यात आली होती. मात्र हे डावपेच यशस्वी झाले नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री पदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का मानला जातो. नाशिक आणि रायगड यामध्ये राजकीय अंडरस्टँडिंग आणि ॲडजस्टमेंट या दोन्ही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या आधारे आपला अधिकार सांगितला होता. आता मात्र सर्वाधिक आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे गेले. गेल्या काही दिवसांपासून या पक्षात विसंवाद असल्याचे लपून राहिले नव्हते. जेष्ठ मंत्र्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने त्याची राजकीय संधी महायुतीच्या नेत्यांनी घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचा कारभार एकनाथ शिंदे यांचा विश्वासू गोगावले यांच्याकडे सोपावला. त्याच वेळेस विविध आरोप आणि टीका होत असताना गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचा कारभार देण्यात आला आहे. आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सूचक मानला जातो. त्यामुळे पालकमंत्र्याच्या नियुक्तीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची अर्थ खात्यापाठोपाठ हक्काच्या पालकमंत्री पदासाठी राजकीय सेटबॅक मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.