Abhijeet Dhoble : लक्ष्मण ढोबळेंच्या चिरंजीवाचा मोहोळमधून विधानसभेसाठी शड्डू; 'पक्ष जनतेशी विचारून ठरवणार'

Mohol Assembly Election 2024 : जनतेचा कौल घेऊनच कोणत्या पक्षाकडून विधानसभा लढवायची हे निश्चित करण्यात येईल.
Abhijeet Dhoble
Abhijeet DhobleSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 15 July : माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विधानसभेची आगामी निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे. मात्र, पक्ष निश्चित केला नाही. जनतेचा कौल घेऊनच कोणत्या पक्षाकडून विधानसभा लढवायची हे निश्चित करण्यात येईल, अशी माहिती महात्मा फुले सूत गिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे यांनी दिली.

अभिजीत ढोबळे (Abhijeet Dhoble) यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात (Mohol Assembly Constituency ) वंदन परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या यात्रेचा शुभारंभ मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. या यात्रेचे स्वरूप राजकीय नसले तरी तिचा टायमिंग पाहता त्यामागे विधानसभा निवडणूक लढविण्याचा हेतू स्पष्ट होतो.

मोहोळ मतदारसंघातून अभिजीत ढोबळे विधानसभेची निवडणूक लढविणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी मोहोळ मतदारसंघाचे किंगमेकर राजन पाटील यांना बोलावल्याने ढोबळे हे पाटलांच्या मदतीने विधानसभेच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

राजन पाटील यांनी मोहोळमध्ये वंदन परिक्रमा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आणि लागलीच मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार यशवंत माने यांनी उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे पाटील आणि ढोबळे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निकाली निघाली. मात्र ढोबळे कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविणार, याबाबत चर्चा सुरू झाली.

Abhijeet Dhoble
Chandrashekhar Bawankule : भाजपच्या बड्या नेत्याची पवार-भुजबळ भेटीवर प्रतिक्रिया; ‘भुजबळांच्या मनात काय माहिती नाही; पण...’

अभिजीत ढोबळे यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम आहोत. मात्र, पक्ष कोणता असणार, याबाबतची भूमिका मात्र त्यांनी स्पष्ट केली नाही. जनतेशी चर्चा करून पक्षाबाबतची भूमिका जाहीर करू. मोहोळ आणि मंगळवेढा मतदारसंघातून अभिजीत यांचे वडील लक्ष्मण ढोबळे यांनी वीस वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. लक्ष्मण ढोबळे हे 2009 ते 2014 या काळात मोहोळचे आमदार होते.

महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार, याबाबत संभ्रम आहे, त्यामुळे या गटातून उमेदवारी कोणाला मिळणार, याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली.

Edited By : Vijay Dudhale

Abhijeet Dhoble
Milind Narvekar Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर आमदार मिलिंद नार्वेकरांचे मोजक्याच शब्दांत सूचक ट्विट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com