

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका नंतर सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनानुसारच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पद आणि सभापती पदी विविध विविध नेत्यांची वर्णी लागल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात जी गोष्ट पुणे जिल्हा परिषदेच्या 64 वर्षाच्या इतिहासात घडली नव्हती ती घडली आहे.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी विविध विषय समित्यांच्या सभापती पदांचे वाटप आज जाहीर केले. यात मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांच्याकडे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद सोपविण्यात आले, तर वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद देण्यात आले. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन तसेच शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत एकूण सहा विषय समित्यांच्या सभापती पदांचे वाटप करण्यात आले. यावेळी तीन सभापतींना प्रत्येकी दोन समित्यांची जबाबदारी देण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. अनुभवी आणि स्थानिक पातळीवर काम केलेल्या सदस्यांना महत्त्वाच्या समित्यांमध्ये संधी मिळाल्याने आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बांधकाम व आरोग्य समिती ही पुणे जिल्हा परिषदेतील अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. पायाभूत सुविधा, रस्ते, इमारती, आरोग्य सेवा, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता अशा मूलभूत बाबींशी संबंधित निर्णय या समितीतून घेतले जातात. या समितीच्या सभापतीपदावर दीपाली हुलावळे यांची नियुक्ती झाल्याने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात ठोस कामगिरी होण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद सोपविण्यात आले आहे. ही समिती शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती विकास, पशुपालन आणि संबंधित सरकारी योजनांच्या अंमलबजावणीशी निगडित आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि कृषी क्षेत्रात प्रगती घडवणे ही नलावडे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून (सन १९६२) आजतागायत म्हणजेच ६४ वर्षांच्या कालखंडात बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी एकाही महिलेला संधी मिळाली नव्हती. यंदा पहिल्यांदाच दीपाली हुलावळे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात बांधकाम समितीच्या सभापतीपदी महिला होण्याचा मान दीपाली हुलावळे यांनी पटकावला आहे. ही नियुक्ती पवार यांच्या नेतृत्वात झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.