Hasan Mushrif : 'गोकुळमध्ये मुश्रीफांना विरोधच', पण...; महायुतीच्या व्यासपीठावरून आमदार शिवाजीराव पाटील भडकले

Shivajirao Patil Vs Hasan Mushrif : भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळ निम्मित पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना डिवचत आपला त्यांना कायमच विरोध राहिल असे म्हटलं आहे.
Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patilsarkarnama
Published on
Updated on

Gokul Election News : विधानसभा निवडणुकीत मला टार्गेट केले, पण आज पश्चाताप होत आहे. चंदगडमध्ये आम्हाला दुर्लक्ष केले. आमचा केवळ गोकुळमध्ये वापर करून घेतला. आजपर्यंत चंदगडला काय दिले? असा सवाल करत हसन मुश्रीफ यांना माझा व्यक्ती म्हणून गोकुळमध्ये विरोध आहेच. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशापुढे जाणार नाही, असा घणाघात महायुतीच्या व्यासपिठावरून भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळ निम्मित आयोजित मेळाव्यातून केला.

अवसयानात निघालेल्या 1320 व मध्यंतरी आदेशातील 427 दूध संस्था मध्ये आमच्या देखील आहेत. 1100 शे संस्था अपात्र झाल्या आहेत. गैरकारभार सुरु होता म्हणून आम्ही गोकुळवर प्रशासक लागले पाहिजे. एसआयटी लागली पाहिजे म्हणून आम्ही मागणी केल्याचे स्पष्टीकरण आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले.

आमच्याकडे अजून एमबीबीएस डॉक्टर नाहीत, मला वाईट वाटतंय. आजपर्यंत चंदगडला या नेत्त्यांनी काय दिले. जे अपात्र केलेल्या संस्थेच्या सभासदांसाठी जे कोर्टात गेले त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार. पण चंदगड तालुक्याला न्याय मिळवून देणार असेही आमदार पाटील म्हणाले.

Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Election : 'गोकुळ' बिनविरोध करण्याचे प्रयत्न... पण 'या' दोन बड्या नेत्यांमधील वैर ठरणार सर्वात मोठा अडथळा!

नेत्यांना सोबत येण्यासाठी साद...

यावेळी शौमिका महाडिक यांनी, आमच्याकडे बोगस संस्था नाहीत. एका मतांसाठी दुसरे बोगस मत तयार केलेलं आमच्याकडे नाही. आमच्याकडे 1430 संस्था आहेत. त्यामध्ये बोगस, अवसयानातील आणि एसआयती चौकशीतील दूध संस्था नाहीत. यामुळे माझा विरोध हा व्यवस्थेच्या विरोधात आणि चुकीच्या कार्यपद्धतीवर होता. कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Election : "मुश्रीफांना पाठिंबा कोणत्या अधिकारातून दिला?" : महिला नेत्याला कार्याध्यक्षांचा सवाल; शरद पवारांच्या पक्षातील वाद चव्हाट्यावर

महायुतीचा अध्यक्ष असताना देखील मी चुकीच्या कामना विरोध केला आहे. जे आमच्यासोबत नाहीत. त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आमच्यासोबत यावे. सहकारात सर्वाना सोबत घेऊन दूध उत्पदकांचा कल्याण करावे असेही महाडिक म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com