

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी अतिउत्साहात पक्षाचा कोणताही आदेश नसताना महायुतीला पर्यायाने मंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाठिंबा देऊ केला. इतकेच नाहीतर गोकुळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार अशी घोषणाही केली.
पण प्रदेश कार्यालयाकडून अथवा जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्याकडून कोणत्याही सूचना नसताना त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल करत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे आज (10 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे याच दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील दुफळी समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सर्किट हाऊस येथील शाहू सभागृहात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असे सांगितले. त्याचबरोबर अजितदादांच्या दुःखद निधनानंतर हा विषय पूर्णतः थांबवला असून महाविकास आघाडी बरोबर एकत्रित काम करावयाचे आहे असा आदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
असे असताना दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लज येथे मेळावा घेऊन डॉ. नंदा बाभुळकर यांनी गोकुळ आणि केडीसी बँकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील अशी घोषणा केली होती. पण नंदा बाभूळकर यांनी व्यक्तिगत भूमिका पक्षाला गृहीत धरून घेवू नयेत, असे प्रत्युत्तर घाटगे यांनी दिले आहे.
गोकुळ दूध संघ व कोल्हापूर जिल्हा बँक या दोन्ही ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे सन्मानपूर्वक जागा पक्षाला मिळतील. लवकरच प्रदेश कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल होईल हे सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.