Satara News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उद्या (ता. 20 जानेवारी) मनोज जरांगे-पाटील मुंबईला रवाना होणार आहेत. मराठा आरक्षणाचं रान उठवलं असल्याचे सांगत या आंदोलनाला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पाठिंबा दिला. ठाकरे सरकारच्या काळात कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण झाले आणि सुप्रीम कोर्टात टिकलेलं आरक्षण रद्द झालं, अशी टीकाही आमदार भोसले यांनी केली. (BJP MLA Shivendra Raje supports Manoj Jarange-Patil's movement)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. याबाबत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी आपली भूमिका मांडली. आता क्युरिटी पिटीशन दाखल करून घेतलं आहे. तसेच, कुणबीच्या नोंदी सापडत आहेत, सरकार दाखले देत आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देतील, असा विश्वासही शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीवर आरोप
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महायुतीचे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होत. ही वस्तूस्थिती आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार आले, तेव्हा त्या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झालं. सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण का रद्द झालं? त्यावेळी म्हणावं तसं लक्ष दिलं नसल्याचा आरोपही महाविकास आघाडी सरकारवर शिवेंद्रराजेंनी केला.
जरांगे-पाटील यांच्यावर कोणताही ट्रॅप नाही : शंभूराज देसाई
मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल होणारे मनोज जरांगे-पाटील यांच्यावर ट्रॅप लावला असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी असा कोणताही ट्रॅप लावला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, हे मी खात्रीपूर्वक व 110 टक्के खरे सांगत आहे. जरांगे-पाटील यांच्याकडे अशी कोणती माहिती असल्यास त्यांनी मला द्यावी.
साताऱ्यातून मुंबईला जाण्यासाठी जय्यत तयारी
सातारा जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील मराठाबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून यासाठी जनजागृतीचे काम मराठा समन्वयकांनी हाती घेतले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी रॅली, ट्रॅक्टर रॅली, तसेच रथांचे आयोजन करून प्रबोधनही केले जात आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.