PM Modi In Solapur : मोदींचे सोलापूरशीही ऋणानुबंध; पद्मशाली समाजाशी "अशी" जोडली नाळ

PM Modi Remembers Padmashali Samaj In Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा चर्चेत...
PM Modi
PM Modi Sarkarnama
Published on
Updated on

PM Modi Solapur Visit News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात दौरे करीत असतात. या दौऱ्यादरम्यान ते ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणाशी किंवा तेथील संस्कृतीशी आपला ऋणानुबंध असल्याची भावना व्यक्त करताना दिसून येतात. तसेच त्यांच्या जीवनात संबंधित ठिकाणावरील व्यक्तींचा कशा प्रकारे संबंध आला होता, याची आठवण करून देतात. त्यांच्या या आठवणींचा एक पैलू सोलापूरकरांनाही शुक्रवारी अनुभवायला मिळाला. PM Modi यांनी सोलापुरातील पद्मशाली समाजाशी आपले लहानपणापासून ऋणानुबंध जोडले गेले असल्याची आठवण करून दिली.

PM Modi
Narendra Modi In Solapur : आडममास्तरांची तब्येत अन् मोदींचा टोला; सोलापुरात नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी सोलापुरातील रे-नगर या असंघटित कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. 30000 घरांच्या या प्रकल्पातील 15000 घरांचे हस्तांतर मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सोलापूरशी आपली नाळ जोडली असल्याचा उल्लेख केला.

मोदी म्हणाले, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईलचे उद्योग आहेत. त्याप्रमाणे अहमदाबादमध्येही मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल कंपन्या आहेत. त्यामुळे जसे सोलापूर ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते, तसेच अहमदाबाददेखील कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अहमदाबाद आणि सोलापूरचे जवळचे नाते असल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी म्हणाले, की फक्त अहमदाबादच नाही तर माझे आणि सोलापूरचेही आणखी जवळचे नाते आहे. कारण अहमदाबादमध्ये पद्मशाली समाजाची अनेक कुटुंबे वास्तव्याला आहेत. मी लहान असताना महिन्यातून 3 ते 4 वेळा पद्मशाली कुटुबांत जेवण केले असेल. ते चाळीमध्ये राहायचे. मात्र बेताची परिस्थिती असतानाही त्यांनी मला कधी उपाशी झोपू दिले नाही, अशी आठवण सांगत मोदींनी आपली सोलापूरशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय मोदींनी सोलापूरशी जोडल्या गेलेल्या आणखी काही आठवणी सांगताना इथल्या हातमागाच्या कलाकुसरीचे कौतुक केले. त्याची आठवण सांगताना मोदी म्हणाले की, मला एके दिवशी सोलापूरच्या एका व्यक्तीने हाताने विणून तयार केलेला साताऱ्याचे लक्ष्मणराव इनामदार यांचा फोटो मला भेट म्हणून पाठवून दिला होता. त्यामुळे आजही सोलापूर माझ्यात, हृदयात सामावले असल्याची मधाळ भावना त्यांनी उपस्थितांपुढे व्यक्त केली. तसेच मी जे जॅकेट वापरतो त्यातील काही जॅकेट हे सोलापुरातून येत असल्याचाही उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आवर्जून केला.

edited by sachin fulpagare

R...

PM Modi
PM Modi: मोदींनी दिली त्यांच्या तिसऱ्या टर्मची गॅरंटी; म्हणाले, 'आगामी निवडणुकीत भाजपचेच सरकार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com