

Solapur, 07 November : सोलापुरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातील वादावर भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी भाष्य केले आहे. पक्षाचे वरिष्ठ या वादाची दखल घेतील आणि आपलं बोलणं, वागणं आणि कृती कशी असावी, याबाबत नक्कीच समज देतील, असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात दोन दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांना भिडले होते. त्याबाबत सोलापूर शहरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या वादावर दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, वाईटातून चांगलं कसं होईल, याचा आपण विचार करू. एखादी घटना घडत असते, तो वाद अथवा ती घटना अनावधानाने घडली असेल. पक्षाचे वरिष्ठ त्याची दखल घेतील आणि त्यांना नक्कीच समज देतील.
आपलं बोलणं, वागणं आणि कृतीसुद्धा कशी असावी, याबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ दखल घेऊन त्यांना सूचना देतील, अशी अपेक्षा करूया. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ त्यांना योग्य कानमंत्र देतील. पाहिजे तसा तोडगा काढतील, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, उजनी धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत आमदार सुभाष देशमुख म्हणाले, उजनी धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यात येणार नसल्याने त्याचा फटका दक्षिण सोलापूरला बसू शकतो.
दक्षिण सोलापूर हा भाग कर्नाटक सीमेशी जोडलेला असल्याने पाणी दक्षिण सोलापूरपर्यंत येणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र, त्याचा फटका दक्षिण सोलापूरला बसू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.