Solapur Politic's : सोलापुरात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा : भाजप आमदार अन्‌ काँग्रेस शहराध्यक्षांमध्ये हमरीतुमरी; माजी उपमहापौर, पोलिसांची मध्यस्थी

Devendra Kothe Vs Chetan Narote : सोलापुरात भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातील शाब्दिक वाद वाढला. गुरुवारी मध्यरात्री दोघे समोरासमोर आले; दिलीप कोल्हे आणि पोलिसांनी मध्यस्थी केली.
Devendra Kothe-Chetan Narote
Devendra Kothe-Chetan NaroteSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 06 November : ‘लोकशाही वाचवा-अराजकता हटवा’ म्हणत आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी भाजपवर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘दिमगी पैदल’ म्हणत टीका केली होती. त्यावर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘महागाढव’ म्हणून खासदार शिंदेंना उत्तर दिले होते. त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेस भवन’समोर कोठेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यात नरोटे यांनी कोठेंना उद्देशून ‘चाटूगिरी करणारा’,‘कुत्रा’ असे शब्द वापरले. त्याला आमदार कोठे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हरामखोर, विश्वासघातकी असे म्हणत प्रत्युतर दिले. हा वाद वाढत गुरुवारी (ता. ०५ नोव्हेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास हे दोन्ही नेते समोरासमोर आले. पण, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि पोलिस अधिकाऱ्यांनी वेळी मध्यस्थी करत वाद मिटविला. दरम्यान, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना समाजावून सांगितले. आता पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे बैठक सुरू आहे.

सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. उजनी धरण परिसरातील डेटा सेंटर, राहुल गांधी यांच्या आंदोलनाला प्रत्युतर म्हणून भाजपकडून ‘लोकशाही वाचवा-अराजकता हटवा’ आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असलेल्या त्या आंदोलनावर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांना ‘महागाढव’ असे संबोधले होते. त्यावर सोलापुरात भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात वाद पेटला आहे.

चेतन नरोटे म्हणाले, देवेंद्र कोठे सत्तेचा माज, उन्मती आल्यासारखे बोलत आहेत. महिला खासदारावर काय बोलावं, याचं भान त्यांना नाही. आमदार असूनही गल्लीबोळातील कुत्र्यासारखं तुम्ही त्यांच्यावर भुंकता. ज्या शिंदे साहेबांचं तुम्ही बूट चाटत होता, ते तरी विसरू नका. ज्यांनी तुम्हाला एवढं वैभव दिलं. त्या भगिनीला तुम्ही अशा पद्धतीने भूंकत असाल तर जनता तुम्हाला सोडणार नाही.

आमच्या महिला भगिनींनी त्यांच्या फोटोवर चपला मारल्या आहेत. यापुढेही तुम्ही खासदार प्रणिती शिंदेंवर भूंकत असाल तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही नरोटे यांनी इशारा दिला.

आमदार कोठे यांनीही अतिशय शिवराळ भाषेत चेतन नरोटे यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, हरामखोर चेतन नरोटे, तू कुत्रा म्हणून घेण्याच्याही लायकीचा नाही. तू विश्वासघातकी आहेस. खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना लांडगा म्हणत असताना तू शेजारी बसून दात काढत होता. खासदार शिंदे यांना महागाढव म्हटल्यानंतर तू आज स्वतःचं दुकान चालवण्यासाठी आज आंदोलन करतो. तू पांढऱ्या पायाचा आहे, तुझ्या पायगुणामुळे काँग्रेस संपली.

Devendra Kothe-Chetan Narote
Satara Dcc Bank : सातारा जिल्हा बॅंकेत सख्ख्या साडूंची एन्ट्री : देसाई कुटुंबातील शंभूराज यांचे 54 वर्षांनंतर, तर उंडाळकरांचे 5 वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन

हरामखोर, नालायक माणसा तुला तुझ्या प्रभागातील माणसांना निवडून आणता आलं नाही. लोकाच्या दारात उभं राहिल्यानंतर तू निवडून आला. नीच माणसा, तू शहराध्यक्ष म्हणून स्वतःकडे नेतृत्व म्हणून बघतो. तू कार्यकर्त्याच्या प्रचाराला गेला नाही, त्यांना निवडून येण्यासाठी बळ दिलं नाही, इतका तू विश्वासघातकी आहेस, असेही त्यांनी म्हटले आहे.

तू जास्त हवेत उड्या मारून जास्त शहाणपण करू नकोस. तुला गल्ली कोणी कुत्रंही विचारायला तयार नाही. नेत्याला खूश करण्यासाठी स्वतःचा इतिहास विसरू नकोस. तात्या कोठे, महेश कोठे यांचा संदर्भ देऊ नकोस. तू विश्वासघातकी असून बाप बेटीमध्ये गट करण्याचे काम केले, त्यामुळे काँग्रेस तुझ्यावर दुखावलेली आहे. नीच माणसा तुझ्या मर्यादेत राहा, औकातीच्या बाहेर जाऊ नको, असा इशाराही कोठे यांनी नरोटे यांना दिला.

हा वाद वाढत गेला आणि गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आमदार कोठे आणि चेतन नरोटे हे शहरातील मरीआई चौकात समोरासमोर आले होते. त्यावेळी माजी उपमहापौर कोल्हे यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनीही वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे संघर्ष टळला. पोलिसांनी दोघांच्याही घरासमोर बंदोबस्त लावला आहे.

Devendra Kothe-Chetan Narote
Satara Politic's : जयाभाऊ...दगाफटका नेमका कोणी केला...शिवसेना की राष्ट्रवादी?: साताऱ्यात चर्चेला उधाण

दरम्यान, पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी या वादात मध्यस्थी करत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे आणि चेतन नरोटे यांनाही बोलावण्यात आले आहे. दोघांमध्ये वाद वाढणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. खुद्द नरोटे यांनीही आम्ही वाद वाढवायचा नाही आणि आम्ही वैयक्तिक पातळीवर बोलणार नाही, त्यांनीही बोलू नये,असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.