Vijaykumar Deshmukh : संघाच्या चिंतन बैठकीला आमदार विजयकुमार देशमुखांची दांडी; चर्चेला उधाण

BJP-Rss Meeting : भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी, यासाठी संघाच्या पुढाकाराने सोलापुरात चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, विजयकुमार देशमुख यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याची बैठकीला गैरहजर राहणे, ठळकपणे जाणवणारी गोष्ठ ठरली आहे.
Vijaykumar Deshmukh
Vijaykumar Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 September : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खडबडून जागे झाले आहेत. लोकसभेतील चुका टाळून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी संघ आणि भाजपच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्या बैठकीला सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे गैरहजर होते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या बैठकीला देशमुखांनी मारलेली दांडी सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर काही दिवसांपूर्वी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत संघ परिवारातील संघटना आणि भाजपमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत समन्वय राहावा, यासाठी समन्वय नेमण्याची ठरले होते.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या वतीने सोलापुरात (Solapur) चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या चिंतन शिबिराला संघाचे पुणे विभागीय कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, प्रवीण दबडगावकर,

आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, माजी महापौर शोभा बनशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे इच्छुक पांडुरंग दिंड्डी, दक्षिणमधून इच्छुक असलेले उदय पाटील आदी उपस्थित होते. मात्र, सोलापूर शहरातील आमदार असूनही विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) हे बैठकीला गैरहजर होते.

Vijaykumar Deshmukh
MIM-Shivsena Meeting : गुप्त बैठक कशासाठी..? उघडपणे युती करा; जलील-शिवसेना नेत्याच्या बैठकीवर शिरसाटांचा हल्ला

भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी, यासाठी संघाच्या पुढाकाराने सोलापुरातील हरिभाऊ देवकरण प्रशालेत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विजयकुमार देशमुख यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याची बैठकीला गैरहजेर राहणे, ठळकपणे जाणवणारी गोष्ठ ठरली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार देशमुख यांना संघाच्या मदतीची किंवा चिंतनाची गरज नाही का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात संघाचे एक वरिष्ठ स्वयंसेवक म्हणाले, विजयकुमार देशमुख यांना महत्त्वाचे काम होते, त्यामुळे ते चिंतन बैठकीला येऊ शकले नाहीत. परंतु ते पुन्हा येऊन आम्हाला भेटले, त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये समन्वयाचा अभाव आहे, असे कुठेही नाही. उलट भाजपचे लोकप्रतिनिधी आणि संघामध्ये उत्तम प्रकारचा समन्वय आहे, असा दावाही त्या ज्येष्ठ स्वयंसेवकाने केला.

Vijaykumar Deshmukh
Maharashtra Politics : फडणवीसांच्या गैरहजेरीत अजितदादा अन्‌ एकनाथ शिंदेंची राजकीय चर्चा, शिवसेना नेत्याचा दुजोरा

दरम्यान, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख पुन्हा एकदा इच्छूक आहेत. तसेच, माजी महापौर शोभा बनशेट्टी, चन्नवीर चिट्टे इच्छूक आहेत. त्यामुळे देशमुखांना या वेळी तिकिटासाठी स्वकीयांशी स्पर्धा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com