भगीरथ भालकेंना धक्का : तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फाटाफूट; CM फडणवीसांच्या भेटीनंतर जवळचा सहकारी भाजपच्या वाटेवर

BJP News : पंढरपूर-मंगळवेढा राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. भगीरथ भालके शिवसेनेत गेल्यानंतर बबनराव आवताडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस भेटीनंतर अधिक जोर आला आहे.
Political equations shift in Pandharpur-Mangalwedha as Bhagirath Bhalkhe joins Shiv Sena while Babanrao Awtade’s BJP entry discussions gain momentum.
Political equations shift in Pandharpur-Mangalwedha as Bhagirath Bhalkhe joins Shiv Sena while Babanrao Awtade’s BJP entry discussions gain momentum.Sarkarnama
Published on
Updated on

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी अनेकांचा भाजप प्रवेश घडवून आणला. मात्र नगरपालिका निवडणुकीत भाजपला हरवून पंढरपूर- मंगळवेढा नगरपालिकेत सत्ता काबीज करणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फाटाफूट झाली आहे. पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके, भगीरथ भालके यांच्यासह आघाडीच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर डीसीसी बँकचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांनी नुकतीच पालकमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मंगळवेढ्यात रंगू लागली आहे .

मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत भगीरथ भालके व बबनराव अवताडे यांनी एकत्रित तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली त्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नऊ सदस्य विजयी झाले. निवडणुकीनंतर बबनराव आवताडे व काही निवडक स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र त्यांचा शिवसेना प्रवेश झाला नाही.

नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीत खटके उडाले, त्यामुळे पक्षनेते म्हणून निवड केलेल्या जागी दुसरा पक्षनेता नेमण्यात आला. गत महिन्यात भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रवेशावेळी बबनराव अवताडे व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते. मात्र, मंगळवारी मंगळवेढा शहरातील प्रलंबित विकास कामाच्या संदर्भात आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील भूमिगत गटार, भागातील पिण्याचे पाणी व नगरपालिकेला पूर्णवेळ अधिकारी नेमणूक करणे याशिवाय महात्मा बसवेश्वर, संत चोखोबा स्मारकाचा प्रश्नसोडण्यासंदर्भात निवेदन दिले.

Political equations shift in Pandharpur-Mangalwedha as Bhagirath Bhalkhe joins Shiv Sena while Babanrao Awtade’s BJP entry discussions gain momentum.
Solapur BJP Politics: सोलापूरमध्ये भाजप शिंदेंचाच डाव 'रिपीट' करणार;दिग्गजांचा पत्ता कट? विधान परिषदेसाठी 3 महिला नेत्यांची नावं समोर

यावेळी मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, राजेंद्र सुरवसे उपस्थित होते. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इच्छुक जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते, त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवताडे यांच्या भाजप प्रवेशची चर्चा रंगली आहे.

Political equations shift in Pandharpur-Mangalwedha as Bhagirath Bhalkhe joins Shiv Sena while Babanrao Awtade’s BJP entry discussions gain momentum.
Solapur Collector : सोशल मीडियावर चक्क कलेक्टरच्या नावानेच बनविले बनावट खाते : थायलंड, व्हीएतनाममधून केली पैशांची मागणी

बबनराव अवताडे, सिद्धेश्वर अवताडे, नगराध्यक्षा सुनंदा अवताडे व अन्य काही नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला तर त्याचा फायदा विधानपरिषद निवडणुकीसाठी होऊ शकतो, याबाबत बबनराव अवताडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com