Ajitdada Vs Jayantrao : होय, मला विरोधी पक्षनेता व्हायचं होतं; पण अजितदादांनी... : जयंतरावांचं ‘त्या’ वादावर भाष्य

NCP News : माझे आणि अजितदादांचे व्यक्तिगत संबंध फार चांगले आहेत. आता अलीकडे भेटच होत नाहीत, त्यामुळे संबंध कसे आहेत, हे तपासता येत नाही.
Jayant Patil-Ajit Pawar
Jayant Patil-Ajit PawarSarkarnama

Mumbai News : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर मी स्वतः अजितदादांना म्हटलं होतं की, मी आता विरोधी पक्षनेता होतो, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हा. त्या वेळी त्यांनी नकार देत मला विरोधी पक्षनेता व्हायचं आहे, असं सांगितलं. त्यावेळी त्यांचं आम्ही मान्य केले. मला त्या वेळी विरोधी पक्षनेता व्हायची इच्छा होती. पण, ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या कथित वादावर आणि त्यानंतर रंगलेल्या नाराजीनाट्यावर भाष्य केले. (I wanted to be Leader of Opposition : Jayant Patil)

एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे येणार हे निश्चित होते, त्या वेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते होणार असल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादीत वाद रंगल्याची चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil-Ajit Pawar
Shivsena Convention : शिवसेना नाशिकमधून फुंकणार लोकसभेचे रणशिंग; 28 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होणार

जयंत पाटील तब्बल सव्वा महिना आपल्या इस्लामपूर मतदारसंघाच्या बाहेर फिरकलेच नव्हती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने जयंत पाटील नाराजी असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांचा पहिलाच कार्यक्रम पुण्यात होता. त्या कार्यक्रमात पत्रकारांनी त्यांना नाराजीबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर नाराजी तुम्हाला दिसते का, असा उलटा सवाल केला होता. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत कुरबुरी झाल्याची तेव्हा चर्चा होती.

त्या वादासंदर्भात जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांची विरोधी पक्षनेता होण्याची मागणी आम्ही सर्वांनी मान्य केली होती. पवारसाहेबांनी त्यांचं म्हणणं कधी डावलं नाही. अजितदादांनी आग्रह केल्यानंतर मीही माघार घेतली आहे. त्या वेळी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, मी आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. छगन भुजबळ यांनी मला सांगितले की, तुम्ही पक्षाचे काम बघा आणि अजितदादांना सरकारचं काम बघू द्या. एवढं आमचं अंडस्टॅंडिंग होतं.

Jayant Patil-Ajit Pawar
Kalaben Delkar Meet Modi : ठाकरेंना मोठा धक्का; ज्यांच्यासाठी भाजपबरोबर पंगा घेतला तेच खासदार पक्ष सोडणार?

मागणी करणे गुन्हा असेल तर मी दोषी आहे. मला त्या वेळी विरोधी पक्षनेता व्हायची इच्छा होती. पण, माझी ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण, मी माझ्या पक्षाचे काम सुरू ठेवले. त्यामुळे आमच्यात मतभेद असे कधी झालेच नाहीत. त्यांना जे जे पाहिजे होतं, ते ते पवारसाहेबांनी त्यांना दिलं, असे मला वाटतं. ते चार वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, माझे आणि अजितदादांचे व्यक्तीगत संबंध फार चांगले आहेत. आता अलीकडे भेटच होत नाहीत, त्यामुळे संबंध कसे आहेत, हे तपासता येत नाही. आता आमचे मार्ग बदलले आहेत. फारकत झाली आहे. जो रोल नशिबात असेल तो आम्हाला प्ले करावाच लागेल. राज्यातील जनता महत्वाची आहे, त्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन काही करणं, हे बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा असतो.

Jayant Patil-Ajit Pawar
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

मी ज्या पक्षात आहे, ते पक्ष वाढविण्यासाठी जे करावं लागेल ते आम्हाला पूर्ण करावंच लागेल. पक्षवाढीसाठी जे जे अडथळे असतील त्याच्या विरोधात आम्हाला लढावचं लागणार आहे. त्याला काही इलाज नाही. आणि जे काही होईल ते होईल, असेही जयंतरावांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Jayant Patil-Ajit Pawar
Maratha Reservation : मुंबईत 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण; मनोज जरांगेंनी पुन्हा रणशिंंग फुंकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com