Praniti Shinde Allegation : मतदानाआधी भाजपचा सोलापुरात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता; प्रणिती शिंदेंचा सनसनाटी आरोप

Solapur Lok Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीसांची पिल्लावळ सोलापुरात आली होती. दंगली घडवा; म्हणून त्यांना सांगण्यात आलं होतं.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

Solapur, 15 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपकडून दंगली घडविण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला. या वेळी प्रणिती यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) निवडून आलेल्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) ह्या सोलापुरात कृतज्ञता मेळावे घेत आहेत. सोलापूर (Solapur) शहरात आज (ता. 15 जून) झालेल्या मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, भाजप आणि अतिरेक्यांमध्ये काय फरक आहे. ते बाहेरून देशाला कीड लावतात, हे तर आपल्या देशात राहून कीड लावतात. देवेंद्र फडणवीसांची पिल्लावळ सोलापुरात आली होती. दंगली घडवा; म्हणून त्यांना सांगण्यात आलं होतं.

सोलापूर लोकसभेची निवडणूक भाजपच्या हातातून गेलेली आहे. आता एकच उपाय आहे, आपल्यामध्ये दंगली घडवा. लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यासाठी तुम्ही मतदानाच्या आधीची पाच दिवसांची भाषणं बघा. त्यात तुम्हाला पुरावा मिळेल ते कशी लावालावी करत होते, असा गौप्यस्फोटही प्रणिती शिंदे यांनी केला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा लोकशाहीचा आणि महात्मा गांधींच्या विचारांचा आहे. धार्मिक कलह व जातीय वादाला सोलापूरची जनता भीक घालणारी नाही, हे सोलापूरच्या जनतेने दाखवून दिले. भाजपने सोलापुरात एका साडीबरोबर पाचशे एक नोटही वाटली. पण लोकसभेची निवडणूक सोलापूरच्या जनतेने हाती घेतली होती, त्यामुळेच भाजपला सोलापुरात पराभवाला सामोरे जावे लागले.

Praniti Shinde
Pratap Patil Chikhlikar : 'नांदेडमध्ये पराभव माझा झाला; पण नाचक्की भाजप अन्‌ अशोक चव्हाणांची झाली...!'

‘मी काम केले नाही तर मलाही खाली बसवा’

भाजपच्या मागील दोन खासदारांनी गेल्या दहा वर्षांत सोलापुरात एकही काम केलेले नाही, त्यामुळे सोलापूरची जनता भाजपला कंटाळली होती. मी आता प्रत्येक गावांत जनतेचे आभार मानण्यासाठी येणार आहे. येताना माझ्यासोबत काही अधिकारी असतील, ज्या समस्या जागेवर सोडवता येतील, त्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मी जर विकास कामे केली नाही तर मला कान धरून खाली बसवा, असेही प्रणिती यांनी म्हटले आहे

आगामी चार महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहनही खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

Praniti Shinde
Lok Sabah Election Result : ‘वायव्य मुंबई’ निकाल अपडेट; मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणारी व्यक्ती निघाली वायकरांचा मेहुणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com