Solapur News: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यामध्ये तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मिझोराममध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या पाच राज्यांच्या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.
कारण या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, तर या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या पक्षातील असलेल्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावरूनच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. ते गुरुवारी सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मी माझ्या आयुष्यात असा पंतप्रधान बघितला नाही. ज्या पद्धतीच्या गोष्टी नरेंद्र मोदी मांडत आहेत, त्या पद्धतीचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. मी जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधानांची भाषणे ऐकली आहेत, पण मोदी ज्या पद्धतीने स्थानिक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे चुकीचे आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशा पद्धतीची व्यक्तिगत टीका केली नाही,"असा हल्लाबोल पवारांनी केला.
"पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, जे एखाद्या राज्यात गेले दर दुसऱ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत टीका करतात. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये हेच राजकारण सध्या पाहायला मिळत आहे, पण माजी खात्री आहे की, तेथील लोकं हे मान्य करणार नाहीत आणि याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, ज्यावेळी माणसाचा आत्मविश्वास ढळतो, त्यावेळी माणूस अशा व्यक्तिगत टीका करायला लागतो. पण अशा पद्धतीने व्यक्तिगत टीका करणं चुकीचं आहे," असेही पवार म्हणाले.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.