Pandharpur news : सोलापूर लोकसभेबाबत मी अजून कोणताही निर्णय केलेला नाही. पण, भारतीय जनता पक्षाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे, हे आम्हा कार्यकर्त्यांचे काम आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला, तर सोलापूरचं काय देशभरातून कुठूनही निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे, असे सांगून भाजपश्रेष्ठींनी सांगितले तर सोलापूर लोकसभेतून निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.
अखिल भारतीय मजूदर संघाचे 24 वे अधिवेशन पंढरपूर येथे सुरू आहे, त्याला भेट देण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) आज (ता. 9 मार्च) पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सोलापुरातून (Solapur) लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढविण्यासंदर्भात भाष्य केले. सोलापूरसाठी माजी खासदार अमर साबळे, आमदार राम सातपुते, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. त्यात आता मंत्री खाडे यांची भर पडली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते म्हणाले, मी यापूर्वी जतमधून विधानसभेवर निवडून आलो होतो. पण त्यानंतर भाजपने आम्हाला मिरेजला जावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर आम्ही मिरजेत गेलो. पक्ष आणि पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, तो आम्ही तंतोतंत पाळतो. पक्षाचा आदेश आमच्यासाठी प्रथम आहे. पक्षाचा आदेश आला की, आम्ही काही बघत नाही, त्या ठिकाणी आम्ही ॲरग्युमेंट करत नाही.
भाजपसाठी केवळ सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चांगले वातावरण आहे. त्यामुळे भाजपचे 370 आणि मित्रपक्षासहित चारशे पार खासदार निवडून येतील, असेही खाडे यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आम्हाला अजिबात आव्हान नाही. मोदी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्यापुढे कोणाचेही आव्हान नाही. आव्हान द्यायला त्यांच्याकडे राहायलंय काय?
सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला न्यायालयाने अवैध ठरविला आहे, याबाबत मला माहिती नाही. हे प्रकरण न्यायालयात असेल तर न्यायालय त्याबाबतचा निर्णय करेल. अनुसूचित जातीमध्ये (एससी) अनेक पोटजाती आहेत, त्या पोटजातींचाही अधिकार त्यावर असतो. त्यांचा दाखला जर अवैध असेल तर न्यायालय अवैध म्हणून निर्णय देईल. ज्या जागा आरक्षित आहेत, त्याच जातीचे उमेदवार त्याच जागेवरून निवडून आले पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे बांधकाम मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.