Mahayuti Seat Allotment : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना; आता 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक

Loksabha Election 2024 : येत्या सोमवारी (ता. 11 मार्च) अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. महायुतीमध्ये तीन ते चार जागांवर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे.
Amit Shah-Fadnavis-Pawar-Shinde
Amit Shah-Fadnavis-Pawar-ShindeSarkarnama

New Delhi : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, त्यावर सकारात्मक तोडगा निघू शकलेला नाही. जागावाटपावर आता अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी (ता. 11 मार्च) महायुतीच्या नेत्यांची शाह यांच्याकडे बैठक होणार आहे. त्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपासंदर्भात सध्या महायुतीमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. भाजपकडून महायुतीमधील (Mahayuti) जोडीदार शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एक अंकी जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात शिवसेनेला आठ ते नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ते चार जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते समाधानी नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागावाटपाचा तिढा कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah-Fadnavis-Pawar-Shinde
Congress News : काँग्रेसमध्ये गळती सुरूच, आता माजी केंद्रीय मंत्री करणार भाजपत प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात बैठक झाली. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत ठोस असा तोडगा निघू शकलेला नाही. भाजपकडून देण्यात येत असलेल्या जागा मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस घ्यायला तयार नाहीत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे.

दरम्यान, येत्या सोमवारी (ता. 11 मार्च) अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. महायुतीमध्ये तीन ते चार जागांवर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत या जागांवर एकमत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असे सांगण्यात येत आहे.

R

Amit Shah-Fadnavis-Pawar-Shinde
Madha Loksabha Constituency : माढ्याचा तिढा सुटणार...भाजपचा बडा नेता उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com