Shivsena Shakha Inauguration ठाकरे गटाला मिळालं आयतंच कोलित...मुंबईत भाजप मंत्र्यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद॒घाटन

Mumbai Shivsena News : घाटकोपर येथील शिवसेना शाखेचे उद्‌घाटन भाजप मंत्र्यांच्या हस्ते आणि भाजप आमदाराच्या उपस्थितीत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबईत शिवसेना शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे हा प्रकार घडला आहे, त्यामुळे शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली, अशी टीका करणाऱ्या ठाकरे गटाला या घटनेमुळे आयतेच कोलित मिळाले आहे.

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये आज शिवसेनेच्या १३१ व्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात येणार होते. या शाखेच्या उद्‌घाटनासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना काही कारणामुळे सातारा दौऱ्यावर जावे लागले. त्यामुळे शिंदे यांचा मुंबईतील घाटकोपरचा दौरा रद्द झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mangal Prabhat Lodha
Mahayuti Seat Allotment : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना; आता 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला तरी पंतनगरमधील कार्यकर्त्यांनी शाखेच्या उद्‌घाटनाची जय्यत तयारी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने शाखेचे उद्‌घाटन होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे आज घाटकोपर पूर्वमध्ये डीप क्लीन ड्राइव्ह या कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यामुळे शाखेचे उद॒घाटन भाजपचे मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आणि आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दरम्यान, शिवसेनेच्या शाखा या महाराष्ट्रातील भाजपची कार्यालये होतील, असा आरोप ठाकरे गटाकडून शिंदे सेनेवर करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथील शिवसेना शाखेचे उद्‌घाटन भाजप मंत्र्यांच्या हस्ते आणि भाजप आमदाराच्या उपस्थितीत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Mangal Prabhat Lodha
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात दोन राजघराण्यांमध्ये लढत? शाहू महाराजांविरोधात घाटगे मैदानात उतरण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्यानंतर शिवसेनेच्या कुठल्याही एका मोठ्या नेत्याला बोलावून शाखेचे उद्‌घाटन करता आले असते. मात्र, तसे न करता एका भाजप मंत्र्यांच्या हस्ते शाखेचे उद्‌घाटन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया असणार, याची उत्सुकता आहे.

R

Mangal Prabhat Lodha
Prakash Ambedkar On Congress : प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचं वावडं? थेट निशाणा साधत केला 'प्रहार'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com