
Pune News : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी अनेक बैठका घेऊन खलबत करण्यात आली तरी देखील अद्याप यावर तोडगा निघालेला पाहायला मिळत नाही. रायगडच्या पालकमंत्री पद अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे राहणार की शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार याबाबत महायुतीमध्ये सध्या एकमत होताना पाहायला मिळत नाही. असे असतानादेखील शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत.
दरम्यान पालकमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी वरिष्ठ नेत्यांना साकडे देखील घालत आहेत. आता नेत्यांना साकडं घालून देखील पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघत नसल्याची खंतच गोगावले यांनी व्यक्त केली आहे. तर आता त्यांनी पुण्यातील देवालाच साकडे घातल्याचे पाहायला मिळाळं आहे.
पुण्याच्या वाघोली येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते किडीलँड फ्री किड्स स्कूलच्या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोगावले म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. अशा अतिरेक्याचा खात्मा करण्यासाठी जशास तसे उत्तर देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू आहे. पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर नक्की दिलं जाईल.
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत विचारलं असता गोगावले म्हणाले, देवाकडे अनेक मागण्या मी मागतो. बऱ्याचशा माझ्या इच्छा देवाने पूर्ण देखील केल्या आहेत. माझी पालकमंत्री पदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पुण्यातील वाघेश्वरकडे आल्यानंतर बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात. आता माझी पालकमंत्री पदाची इच्छा देखील येथेच पूर्ण होईल, असं गोगावले म्हणाले.
आमदार गायकवाड यांनी पोलिसांबाबतचे आक्षेपार्य वक्तव्य केलं होतं. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना समज दिली आहे. गायकवाड यांनी देखील पोलिसांची माफी मागितली आहे. भावनेच्या आहारी गेल्यानंतर माणूस असा बोलतो. मात्र चूक कळाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी एवढं टोकाचे बोलणे चुकीचेच असल्याचे देखील गोगावले यांनी सांगितले.
शिंदे आणि फडणवीसांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांवर बोलताना गोगावले म्हणाले, शिंदे, फडणवीस यांच्यात मतभेद दिसून येत अस अजिबात नाही. त्यांच्यात काही मतभेद नाहीत. मीडिया, पेपर वाल्यांनी ते मतभेद असल्याचे चित्र उभे केले आहेत. गेल्या सरकारने घेतलेले काही निर्णय बदलावे लागतात. काही दुरुस्त्या सुधारणा करावी लागतात. त्यामुळे असे काही मतभेद आहेत असं नाही.
माजी आमदार बच्चू कडू यांनी आमच्या मागील महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी ते आमच्या सोबत राहिले नाहीत. जर ते आमच्या सोबत राहिले असते तर त्या ठिकाणी महायुतीने उमेदवार दिला नसता आणि ते आमदार झाले असते. मात्र तसं झालं नाही असंही भरत गोगावले यांनी म्हटलं म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.