Solapur DCC Bank : सोलापूर DCCची फसवणूक करणे अंगलट; दोन माजी आमदारांसह 'स्वामी समर्थ'च्या 24 संचालकांवर गुन्हा

Swami Samarth Sugar Factory News : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 61 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यापोटी साखर कारखान्याने बॅंककडे साखर तारण ठेवली हेाती.
Sidramappa Patil-Shivsharan Birajdar
Sidramappa Patil-Shivsharan BirajdarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 January : तारण साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची 46 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील, आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या 24 संचालकांवर अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा बॅंकेचे इन्स्पेक्टर लक्ष्मीपुत्र हौदे यांनी फिर्याद दिली आहे.

हौदे यांच्या फिर्यादीनुसार स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील (Sidramappa Patil), उपाध्यक्ष काशिनाथ रामचंद्र भरमशेट्टी, संचालक, माजी आमदार शिवशरण हणमंतप्पा बिराजदार, सुरेश भीमशा गड्डी, बसलिंगप्पा शिवशरण खेडगी, स्वामीराव रावसाहेब पाटील, महेश लक्ष्मीपुत्र पाटील, शरणबसप्पा कल्याणप्पा बिराजदार, जयशेखर शिवबसप्पा पाटील, संजीव सिद्रामप्पा पाटील, विवेकानंद बसप्पा उंबरजे, अनिता अप्पासाहेब पाटील, प्रकाश गुरण्णा खांडेकर, हणमंतप्पा बसलिंगप्पा कात्राबाद, बोंडग्या चंद्रमप्पा यमाजी, भीमाशंकर मलप्पा धोत्री, शांतबाई धुळप्पा बाके, तुळसाबाई भीमाशंकर वाघमोडे, यशवंत अंबादास धोंगडे, निजामोद्दीन करमोडीन बिराजदार, श्रीमंत शिवलिंगप्पा देसाई, पिरोजी पुंडलिक शिंगाडे, जलील बंदेनवाज बागवान, प्रभारी कार्यकारी संचालक चंद्रकांत नामदेव मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Sidramappa Patil-Shivsharan Birajdar
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंनी बारामतीत जाऊन पवारांसमोरच पुन्हा 'ती' खपली काढली...!

अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 61 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यापोटी साखर कारखान्याने बॅंककडे साखर तारण ठेवली हेाती. त्यानुसार मंजूर कर्जातील रक्कम श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अकाउंटवर बँकेकडून जमा करण्यात आली होती.

तत्पूर्वी कारखान्याचे अधिकारी आणि पदाधिकारी संचालक मंडळांनी जिल्हा बँकेच्या नावे करारनामा, वचनचिठ्ठी, हमीपत्र व ताबेगहण लिहून दिले होते. त्यानुसार ताबा आमच्या बँकेकडे दिला होता. त्याप्रमाणे बँकेने साखर तपासून गोदामाला कुलूप लावून सील केले होते.

दरम्यान, स्वामी समर्थ सहकारी साखर काखान्याचे संचालक आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने वेळोवेळी एकूण रक्कम 46 कोटी 37 लाख रुपये एवढ्या रक्कमेच्या साखरेची परस्पर विल्हेवाट लावून मिळालेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केला आहे. तसेच, कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे.

Sidramappa Patil-Shivsharan Birajdar
Supriya Sule on Ajitdada : अजितदादांसोबतच्या संबंधावर सुप्रिया सुळेंचे प्रथमच मोठे भाष्य; ‘मी अजित पवारांशी बोलते; पण...’

याबाबतची फिर्याद सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अक्कलकोट शाखेचे बॅंक इन्स्पेक्टर लक्ष्मीपुत्र हौदे यांनी फिर्याद दिली आहे, त्यानुसार स्वामी समर्थ सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील आणि कारखान्याच्या संचालका मंडळावर फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com