Pandharpur MNS : राज ठाकरेंचा पंढरपुरातील शिलेदार अडचणीत; मनसेच्या नेत्यावर ‘हा’ गुन्हा दाखल

Sand Theft Case : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षांवर वाळूचोरी आणि साठवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. थेट तालुकाध्यक्षांवरच गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Pandharpur MNS
Pandharpur MNSSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 August : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत त्र्यंबक पाटील यांच्यावर वाळूचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतानाही वाळूउपसा केल्याने पोलिसांनी पाटील यांच्यावर ही कारवाई केली आहे. तालुकाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वाळू उपशा करण्यासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता मनसेचे (MNS) पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी अजनसोंड (ता. पंढरपूर) येथे भीमा नदी पात्रातून वाळूउपसा केला. पाटील यांनी त्या वाळूची साठवणूक केली होती. त्यावरून शशिकांत पाटील यांच्यावर सोमवारी (ता. 11 ऑगस्ट) गुन्हा दाखल झाला आहे.

पंढरपूर (Pandrapur) तालुक्यातील अजनसोंड येथील भीमा नदीपात्रातून वाळूचोरी होत असल्याची माहिती मंडलाधिकारी रिगन नंदू चव्हाण यांना मिळाली होती. प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या सूचनेनुसार मंडलाधिकारी चव्हाण यांनी कारवाईची रुपरेषा ठरवली. चव्हाण यांनी अजनसोंडचे ग्राम महसूल अधिकारी दादासाहेब सरक, महसूल सेवक दिगंबर बंगाळे, तसेच पोलिस पाटील मेघा घाडगे यांना फोन करून त्याबाबतची माहिती दिली.

मंडलाधिकारी चव्हाण यांच्या फोननंतर सरक, बंगाळे आणि घाडगे यांनी एकत्र येत अजनसोंड ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रस्त्याने भीमा नदीपात्रालगत गेले. त्या वेळी या चौघांना त्या ठिकाणी अवैध वाळूचा एक ब्रॉसचा साठा असल्याचे आढळून आले. त्या अवैध वाळूसाठ्याचा पोलिस पाटील मेघना घाडगे आणि महसूल सेवक दिगंबर बंगाळे यांच्या समक्ष पंचानामा करण्यात आला.

Pandharpur MNS
Rupali Patil Thombare : मिलिंद एकबोटेंना रुपाली ठोंबरेंनी सुनावले; ‘मिस्टर एकबोट्या, अजितदादांबद्दल भाषा नीट म्हणजे नीटच वापरायची...’

संंबंधित वाळू साठ्याबाबत स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केल्याची माहिती मिळाली. त्या अवैध वाळूसाठ्यांची अंदाजे किंमत सहा हजार रुपयांपर्यंत आहे.

Pandharpur MNS
Dr. Babasaheb Deshmukh : गणपतआबांच्या आमदार नातवाने सांगितला विधानसभा एन्ट्रीचा किस्सा; ‘मी निवडून आलोय,’ सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘शक्यच नाही..’

मंडलाधिकारी रिगन चव्हाण यांनी या अवैध वाळूसाठ्याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मनसेचे शशिकांत पाटील यांच्यावर वाळूचोरी आणि त्याचा साठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी याबाबतची माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com