Dr. Babasaheb Deshmukh : गणपतआबांच्या आमदार नातवाने सांगितला विधानसभा एन्ट्रीचा किस्सा; ‘मी निवडून आलोय,’ सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘शक्यच नाही..’

Assembly Entry Story : गणपतराव देशमुख यांचा नातू विधानसभेत पोचला, हे पहायला आज ते स्वतः आज हवे होते, अशी खंतही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बोलून दाखवली आहे.
Dr. Babasaheb Deshmukh
Dr. Babasaheb Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 August : माजी मंत्री (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीत प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत पोहोचल्यानंतर आलेले अनुभव सांगताना त्यांनी सभागृहात एन्ट्रीच आलेल्या अडचणीचा किस्सा सांगितला. तसेच, त्यातून कसा मार्ग काढला, हेही नमूद केले आहे. तसेच, निवडून आल्यानंतर विधानसभेत मांडलेल्या पहिल्या प्रश्नाबाबत भाष्य केले आहे.

विधानसभा सभागृहाच्या एन्ट्रीवेळी घडलेला किस्सा सांगताना डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) म्हणाले, विधीमंडळातील अनेक कर्मचारी आणि अधिकारी हे (स्व.) आबासाहेबांची आठवण सांगतात. पण, मी आमदारकीच्या शपथविधीच्या अधिवेशनाला जाताना साध्या गणवेशात गेलो होतो. विधानसभेत जाताना मला तिथला तीन ते चार सुरक्षा रक्षकांनी अडवले. त्या सुरक्षा रक्षकांच्या मनात सुटा बुटातील किंवा कडक कपड्यातील आमदार आणि नेतेमंडळी अशी प्रतिमा असते.

निवडून आलेल्या आमदाराचा विधानसभेत (Assembly) शपथविधी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला बिला मिळत नाही. शपथविधीपर्यंत त्यांना ओळखपत्रही मिळत नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा सुरक्षा रक्षकांना सांगितले की, ‘मी विधानसभेला निवडून आलो आहे,’ त्यावर त्या सुरक्षा रक्षकाने ‘हे शक्यच नाही,’ असे माझ्या तोंडावरच सांगितले. त्यावेळी माझी अडचण झाली, असेही आमदार देशमुख यांनी नमूद केले.

मी गणपतराव देशमुख यांचा नातू आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना माझा आणि आबासाहेबांचा एकत्र असलेला फोटो दाखवला. त्यानंतर मला विधानसभेच्या सभागृहात एन्ट्री मिळाली. पहिल्या दिवशी दोन ते तीन ठिकाणी, असा अनुभव आला. जेव्हा त्यांना समजलं की (स्व.) गणपतराव देशमुख यांचा नातू पुन्हा एकदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला आहे, तेव्हा विधीमंडळातील अनेक कर्मचाऱ्यांनी येऊन माझी भेट घेतली. त्यांनी माझे अभिनंदन केले. त्या सर्वांनी आबासाहेबांसोबत असलेल्या अनुभवाची चर्चा केली.

Dr. Babasaheb Deshmukh
Solapur-Mumbai Air Service : सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेसाठी महायुती सरकारचा ‘बूस्टर डोस’; सोलापूरकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

(स्व.) आबासाहेबांचा नातू विधानसभेत पोहोचला, हे पहायला ते आज हवे हेाते. पण, आज आपल्यात आबासाहेब नाहीत, याची मोठी खंत आहे, अशी मनातील खंतही सांगोल्यातून प्रथमच निवडून आलेले डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बोलून दाखवली.

Dr. Babasaheb Deshmukh
RPI Leader Extortion Case : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाच्या नेत्याला खंडणीप्रकरणी अटक; राजकीय क्षेत्रात खळबळ!

विधानसभेत मी पहिल्यांदा चारा छावण्याच्या चालकांंना गेली पाच वर्षांपासून बिल मिळाले नाही, तो प्रश्न मांडला. मी हा मुद्दा गेल्या तीन अधिवेशनात मांडत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सचिव जयंत पाटील यांनी आपल्या पाच वर्षांच्या काळात चार वेळा हा प्रश्न मांडला होता. आता त्यांनी थोड्याच दिवसांत चारा छावणीच्या चालकांना त्यांचे बिल देण्यात येईल, असे अश्वासन सरकारकडून आम्हाला देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com