Chandgad: 'मुश्रीफांवर आरोप कशाला? फडणवीसांना सांगा अन् गोकुळ बिनविरोध करा!' : राजेश पाटलांचे शिवाजी पाटलांना खुले आव्हान

Chandgad Assembly, Shivaji Patil, Rajesh Patil: चंदगडमध्ये शासकीय शिबिरात आमदार शिवाजी पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्यात गोकुळ निवडणूक, विकासकामे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांवर रंगलेली राजकीय जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली.
Rajesh Patil, Shivaji Patil
Chandgad Assembly, Shivaji Patil, Rajesh PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandgad Assembly: चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आजी-माजी आमदारांची आणि राजकीय विरोधकांची एकाच व्यासपीठावर जुगलबंदी चांगलीच रंगली. आमदार शिवाजी पाटील यांनी नेहमीप्रमाणे गोकुळ संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर राजेश पाटील पुन्हा माईक घेऊन 'आरोप करण्यापेक्षा आता तुम्हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोला, मुश्रीफ यांनाही सोबत घ्या आणि गोकुळची निवडणूक बिनविरोध करा' असा सल्ला त्यांनी शिवाजी पाटील यांना दिला.

Rajesh Patil, Shivaji Patil
Kolhapur Politics : अंतर्गत वादामुळे महायुतीला तडे; मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 'गोकुळ'मध्ये न्याय होता होता 'केडीसी'तही आग धुमसणार

शासनातर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घेण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर अभियान आज चंदगड मतदारसंघातील महागाव (ता. गडहिंग्लज) येथे झाले. यावेळी आमदार शिवाजी पाटील व माजी आमदार राजेश पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमात पहिल्यांदा राजेश पाटील यांनी हेरे सरंजाम जमीनप्रकरणी शासनाकडून शुल्क माफ करून घेतल्याबद्दल आमदार पाटील यांचे अभिनंदन केले.

शिवाजी पाटील यांनी माईक हातात घेत जुगलबंदी सुरु केली. चंदगडच्या विकासकामांत राजकारण करू नका हेलिपॅड, क्रीडांगण व सैनिक भवनला पाठिंबा द्या यासाठी गावठाणची जागा देण्यात विरोध करू नका, हेरे सरंजाम जमिनीचा अनेक वर्षांचा प्रश्न मी सोडवला. त्यावर माजी आमदार राजेश पाटलांनीही चंदगडच्या विकासकामात राजकारण केलेलेच नाही कारण, विधायक कामांना आपल्यासोबत असल्याचे निकालादिवशीच मी सांगितले आहे. गावठाण जागेबाबत संबंधित गावांनी ठरवायचे असते. विरोध करणारा मी कोण? हेरे सरंजाम जमीन प्रश्नावर कै. नरसिंगराव पाटलांनीही दोन तप संघर्ष केला आहे.

Rajesh Patil, Shivaji Patil
Kolhapur News: 'गोकुळ'नंतर केडीसी बँकेची चौकशी लावणार; शेतकऱ्यांच्या पैशांवर गब्बर झालेल्यांना इशारा, आमदार शिवाजी पाटील- मुश्रीफ संघर्ष पेटला

आमदार पाटील यांचे भाषण संपताच राजेश पाटील यांनी पुन्हा माईक हातात घेऊन आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, 'मंत्री मुश्रीफ हे आमचे नेते आहेत. त्यांनी वारंवार गोकुळ निवडणुकीबाबत फडणवीस यांचा निर्णय अंतिम मानणार असल्याचे सांगितले आहे. आमदार पाटील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. आता आरोप न करता गोकुळ निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात त्यांनी पुढे यावे. 'शासकीय कार्यक्रमातील ही आजी-माजी आमदारांची राजकीय जुगलबंदी चर्चेची ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com