

Sangli Mahapalika : सांगली महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढून काठावर का असेना पण बहुमतात सत्ता स्थापन केली आहे. गत वर्षभरापूर्वीपर्यंत भाजपला ही निवडणूक काहीशी अवघड असल्याचे दिसत होते. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विविध रणनीतीनंतर भाजपने स्वतंत्र लढवून बहुमतात सत्ता स्थापन केली आहे. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मात्र भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत सांगलीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा डाव खेळ सांगली जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याचे नियोजन केले आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होईल असं म्हणत पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर एक प्रकारे दादांनी आपली दादागिरीच दाखवून दिली आहे. "सध्या सुरू असलेल्या सर्व 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप हा क्रमांक एकचा पक्ष राहील. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल," असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, "महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये झाले तेच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये होईल. 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. सर्व ठिकाणी भाजप क्रमांक एकचा पक्ष राहील. जिल्हा परिषदांचा अध्यक्ष महायुतीचाच होईल." उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत ते म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशीच त्यांच्याशी चर्चा झाली होती.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवले होते. या लढाईमध्ये भाजपच्या 39 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 , तर शिवसेनेने 2 जागा निवडून आणल्या होत्या. त्यामुळे भाजपने सत्ता स्थापनेचा दावा ठामपणे केला होता. त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करून महाविकास आघाडीतील पक्षापेक्षा महायुतीतल्याच पक्षांना बाजूला ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
भाजप - 39
शिंदे शिवसेना - 2
काँग्रेस - 18
अजित पवार राष्ट्रवादी - 16
शरद पवार राष्ट्रवादी - 3
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.