

सांगलीतील खणभाग परिसरातील एका 19 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या मोबाईलमधील सोशल मीडिया चॅट्स समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणाच्या मोबाईलमधील चॅट्समधून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली असून, आता या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.
सांगली शहरातील खणभाग परिसरात राहणाऱ्या दुर्वांक प्रमोद शेवाळे (वय 19) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात एका तरुणीसह आणखी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दुर्वांक पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या घराजवळ राहणाऱ्या एका वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी येत होती. तिथे दुर्वांकची त्या तरुणीची ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये मैत्री वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र लग्न करण्यासाठी त्या तरुणीने धर्मांतराची अट घातल्याचा दावा दुर्वांकच्या आई-वडिलांनी केला आहे.
दुर्वांकच्या मृत्यूनंतर त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी इंस्टाग्रामवरील विविध अकाउंट्समधील चॅट्स आणि काही संदेश कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. या संभाषणांमधून धर्मांतरासंदर्भातील चर्चा झाल्याचे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दुर्वांकच्या आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिला मदत केल्याचा आरोप असलेल्या आणखी एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दुर्वांक मानसिक तणावाखाली होता आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी संबंधित व्यक्तींच्या सोशल मीडिया खात्यांचा तपशील आणि डिजिटल डेटा सायबर विभागाकडून मागविला आहे. हा डेटा प्राप्त झाल्यानंतर प्रकरणातील घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.