Shivsena UBT Setback : सचिन अहिरांनी साथ सोडली, पक्षनेतृत्वानं आतातरी आत्मपरीक्षण करावं : आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडलेल्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना सल्ला

MLA Sunil Shinde Reaction On Shivsena UBT Leader : ऑपरेशन टायगर 3.0 हे ठाकरेंचे आमदार फोडण्याचे असेल असा इशारा आधीच एकनाथ शिंदे यांनी दिला होता.
Sachin Ahir joins Eknath Shinde Shiv Sena; Uddhav Thackeray
Sachin Ahir joins Eknath Shinde Shiv Sena; Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडलेल्या सुनील शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नुकताच मोठा धक्का दिला होता. त्यांचे सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. तर आणखी असे ऑपरेशन टायगर पुढे देखील होतच राहतील असा इशारा देखील त्यांनी थेट विधान सभेतून दिला होता. ज्याची जोरदार चर्चा झाली होती. तर ठाकरेंचे 14 आमदार आणि नगरसेवकही फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत होती.

अशातच शिंदेंनी ऑपरेशन टायगर थेट विधानपरिषदेतच करत ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाच गळाले लावले. फक्त आपल्या सोबतच घेतले नाही तर विधान परिषदेतील उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अहिर यांचा अर्ज दाखल केला. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे वक्तव्य समोर आले आहे.

Sachin Ahir joins Eknath Shinde Shiv Sena; Uddhav Thackeray
Shivsena UBT Setback : ठाकरे गटाला मोठा धक्का! असंतोषाचा स्फोट, निष्ठावंत शिवसैनिकांची शिंदेंच्या शिवसेनेकडे धाव

आमदार शिंदे यांनी पक्षातील सर्व नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीचे आत्मचिंतन करणे आवश्यक असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला आहे. पण आपण जे बोललो ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही, त्यांच्याबद्दल आपल्या मनात खूप आदर आहे. त्यांच्याबद्दल आपण वेडंवाकडं बोलणार नाही. पण इतर नेत्यांना आता कळायला हवं की कोणाला किती किंमत द्यायची. ठाकरे कुटुंबियांबद्दल आपल्याला आदर आहे असेही स्पष्टीकरण आमदार सुनील शिंदे यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com