

Maharashtra dam renaming news : राज्यातील शहरे, नगरे, वाड्या-वस्त्या, तालुका, जिल्हा, घाटांचे नामांतरा पाठोपाठ आता धरणांचे नामकरण करण्याचे राज्यातील महायुती सरकारने ठरवले आहे. यातील पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या कोयना जलसागराला, आता नवी ओळख देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कोयना जलसागराचे नामांतर करून त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
यापूर्वी कोयना (koyna) जलसागराला ‘शिवाजी जलसागर’ या नावाने संबोधले जात होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळून त्यांचे पूर्ण नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोयना जलसागराच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत राज्य सरकारने नामांतराला मंजुरी दिली.
कोयना जलसागराचे नामांतर हा केवळ नावातील बदल नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि इतिहासाचा सन्मान असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. शिवप्रेमी नागरिकांची भावना आणि जलसंपदा विभागाचा प्रस्ताव लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे आभार मानले.
कोयना जलविद्युत प्रकल्प आणि जलसाठा हा महाराष्ट्राच्या ऊर्जा व सिंचन व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील शेती, उद्योग आणि वीज निर्मितीसाठी कोयना प्रकल्पाची भूमिका मोठी आहे. नामांतराच्या निर्णयामुळे या ऐतिहासिक जलसाठ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडलेली नवी ओळख मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.