Eknath Shinde Pandharpur Tour : पंढरपुरातील व्हीआयपी दर्शनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी दिला शब्द; वारीच्या तयारीचा घेतला आढावा

VIP Darshan In Pandharpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागेच्या पात्रात उतरून पाय धुतले आणि पवित्र चंद्रभागेचे तीर्थ आपल्या मस्तकी लावले.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 14 July : पंढरीतील दिंड्या-पालख्या बघून आता पांडुरंगाचे दर्शन होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा यंत्रणा दुप्पट कामाला लावली आहे, त्यामुळे पंढरपुरात स्वच्छ्ता खूप चांगली आहे. वारकऱ्यांना कुठलीही कमतरता होणार नाही. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा निर्णय सरकार घेईल, असे व्हीआयपी दर्शनाच्या बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये (Pandharpur) 65 एकराची पाहणी केली. त्यानंतर चंद्रभागा नदीच्या पुलावर उभे राहून चंद्रभागा नदीची व पात्राची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अधिक स्वच्छता करावी, अशी सूचनाही प्रशासनाला केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रभागा नदीचे दर्शन घेतले. चंद्रभागेच्या पात्रात उतरून पाय धुतले आणि पवित्र चंद्रभागेचे तीर्थ एकनाथ शिंदे यांनी आपल्या मस्तकी लावले. त्याच वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रभागा नदी स्वच्छ्ताबाबत काही सूचनाही केल्या.

मोबाईल टॉवलेट, स्नानगृह आदींची संख्या यंदा दुप्पट करण्यात आली आहे. पाणी, मॅंगो ज्यूस आपण पंधरा लाख वारकऱ्यांना देणार आहोत. वैद्यकीय उपचारासाठी आयसीयू, आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. पंढरपूरमध्ये कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून याची काळजी घेत आहोत.

Eknath Shinde
NCP's Jansanman Rally : अजित पवारांनी बारामतीतून फुंकली विधानसभा प्रचाराची ‘तुतारी’!

व्हीआयपी दर्शनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा निर्णय सरकार घेईल. हे सरकार वारकरी आणि गोरगरिबांचे आहे. पंढरपूरमध्ये वाकरी-कष्टकरी आणि शेतकरी असा त्रिवेणी संगम आपण येथे पाहता आहोत. वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आमच्या सरकारचे प्राधान्य राहणार आहे. मी मुख्यमंत्री झाल्यापासून आषाढीची महापूजा सुरू असताना मी मुखदर्शन सुरू ठेवले होते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांची बुलेट सफारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेट गाडीवर बसून आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या बुलेट सवारीची आमदार समाधान आवताडे यांनी सारथ्य केले. भरपावसात मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेची पाहणी केली.

Eknath Shinde
NEXT CM : सत्तारांच्या दाव्याने महायुतीत वाद वाढणार; ‘पुढच्या आषाढीला एकनाथ शिंदेच विठ्ठलाची महापूजा करतील’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com