CM Shinde Islampur Tour : जयंतरावांच्या बालेकिल्ल्यातील राजकीय वातावरण शांत; एकनाथ शिंदे यांचा...

CM Shinde Western (Paschim) Maharashtra News : राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना इस्लामपुरात येऊन लक्ष केले जात आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News  गेल्या पंधरा दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चर्चेत असलेला इस्लामपूर दौरा रद्द झाला आहे. शिंदेंच्या सेनेकडून या दौऱ्याबाबतची जोरदार तयारी करण्यात येत होती, मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने तयारीवर पाणी फिरले. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना इस्लामपुरात येऊन लक्ष केले जात आहे. परंतु तूर्त मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने जयंतरावांच्या बालेकिल्ल्यातील राजकीय वातावरण शांत राहणार असल्याचे चित्र दिसते.

जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री इस्लामपूर शहरात येणार असल्याने त्याबाबतची तयारी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सुरु केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांचा शहरातील खुले नाट्यगृह याठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार होता. संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रशासन राबवत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची चर्चा होती. पण जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनाच या कार्यक्रमासाठी आणण्याचा चंग शिंदे गटाने बांधला होता. CM Shinde Islampur Tour

CM Eknath Shinde
Kolhapur Politics : कोल्हापूर, हातकणंगले शिंदे गटाकडे? आघाडीच्या उमेदवारीवर ठरणार युतीचा पैलवान

शासकीय कार्यक्रम कुठे घ्यायचा याबाबत एकमत होत नव्हते. परंतु शिंदे सेना आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने कार्यक्रम फायनल झाला होता. शिवाय इस्लामपुरात विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होणार होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा इस्लामपूर हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी बालेकिल्ला घेरला आहे. तीन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार तर या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचा दौरा फायनल झाला होता. (Chief Minister Eknath Shinde's visit to Islampur has been cancelled)

गेल्या महिन्यांभरापासून महायुतीचे मातब्बर नेते सातत्याने इस्लामपुरात येत असल्याने जयंतरावांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे चित्र दिसते. या परिस्थितीत इस्लामपुरात (Islampur ) मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम होणार असल्याने ते काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री जिल्ह्यात येतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री इस्लामपूरमध्ये येणार की केवळ वल्गनाच राहणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

Edited By : Rashmi Mane

CM Eknath Shinde
Loksabha Election 2024 : सातारा मतदारसंघ अजित पवारांकडे? बारामती, साताऱ्याला भाजपचा निरीक्षकच नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com