Kalyan Political News : मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला करावा लागणार पराभवाचा सामना ?

MLA Ganpat Gaikwad शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदेच्या कल्याण - भिवंडी लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा ; गणपत गायकवाड यांचा गौप्यस्फोट
MLA Ganpat Gaikwad
MLA Ganpat Gaikwadsarkarnama

शर्मिला वाळुंज

Kalyan Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण - भिवंडी लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. याबाबतच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक गौप्यस्फोट केला आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर भाजपचे उमेदवार विजयी होतील असे त्यांनी या म्हटले आहे.

त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना पराभवाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याण पूर्वेत भाजपकडून जल्लोष करण्यात आला. या वेळी आमदार गणपत गायकवाड बोलत होते.

MLA Ganpat Gaikwad
Narendra Modi : काँग्रेस चारीमुंड्या चित, मोदींचं पहिलं ट्विट; म्हणाले...

शिवसेना Shivsena शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखळा जाणारा हा मतदारसंघ भाजपकडे यावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खासदार डॉ. शिंदे यांनीही मतदारसंघ आपल्याकडेच राहावा, यासाठी ताकद लावली आहे. राज्यात सत्तेत भाजप व शिंदे हे मित्रपक्ष आहेत.

मात्र, स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात वितुष्ट असल्याचे दिसून आले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद वेळोवेळी वाढताना दिसत आहेत. त्यातच आमदार गायकवाड यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. तीन राज्यांत भाजप आघाडीवर असून कल्याण पूर्वेत जल्लोष साजरा करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी आमदार गायकवाड म्हणाले, पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास आहे. यामुळे या तिन्ही राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे, त्यामुळे जल्लोष साजरा करत आहोत. येणाऱ्या काळात राज्याच्या निवडणुका असतील किंवा केंद्राच्या यासर्व ठिकाणी भाजप आघाडीवर असेल. तसेच कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेत जे आमच्या भाजपचे उमेदवार उभे असतील ते निवडून येतील.

Edited By : Amol Sutar

MLA Ganpat Gaikwad
Assembly Election 2023 : तीन राज्यातील विजय पंतप्रधान मोदींवरील विश्वासाचं प्रतीक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com