
Sangli News : नुकताच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत सर्व मंजूरी आणि भूसंपादनाचे काम लवकर करण्यासह महामार्ग लवक करण्याचे आदेश दिले होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम सुरू झाल्यास आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे. यानंतर आता सांगलीतील शेतकऱ्यांनी देखील एल्गार केला असून महामार्गाला विरोध केला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर आता हा महामार्ग उठला असून 19 गावातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पण महामंडळाने 18 गावातील भूसंपदानाला आणि जमिन मोजणीला सुरूवात केली जाणार आहे. तसे आदेशही रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. यामुळे आता सांगलीतील शेतकरी खवळले आहेत.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग होणार अशा बातम्या येताच विरोध सुरू झाला आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शेतकऱ्यांचा विरोध पत्करून विकास करायचा नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, असे म्हटले आहे. तर सांगलीत याला विरोधनसून तो सांगली जिल्ह्यात होईल, असे म्हटले होते.
यानंतर आता रस्ते विकास महामंडळाने 18 गावात भूसंपदानाला आणि जमिन करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत बुधवारी (ता.15) महामंडळाने ऑनलाईन बैठक घेत सूचना दिल्या. याप्रमाणे जिल्ह्यातील 1340 गटांमधून 596 हेक्टर क्षेत्र अधिगृहत केलं जाणार आहे. तर रत्नागिरी ते नागपूर असा राष्ट्रीय महामार्ग असून याला समांतर महामार्ग नको अशी भूमीका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात विरोध झाल्याने तो आता सांगलीपर्यंत केला जाणार आहे. कोल्हापूर वगळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिन अधिगृहन केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार विरोध झाल्याने सरकारने तात्पुरते नमते घेतलं आहे. आता सांगलीपर्यंत भूसंपादन आणि क्षेत्र मोजणी केली जाणार आहे. तसेच ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातही होणार आहे. पण आता सांगलीतील 19 गावांतील शेतकऱ्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने महामार्ग पुढे रेटल्यास आंदोलन उभारू भूसंपादनाची प्रक्रिया रोखू असा इशारा दिला आहे. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिंगबर कांबळे यांनी, आपण शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढायला तयार असल्याचे म्हटले आहे.
कांबळे यांनी याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून, महामार्गाला विरोध करताना, या महामार्गामुळे 19 गावातील शेती उद्धवस्त होणार असून द्राक्षबागा, ऊस शेती आणि हजारो झाडांची कत्तली होणार आहेत. नदी काठावर वसलेल्या गावांना थेट पुराचा फटका बसणार आहे. तर या महामार्गात अल्पभूधारक शेतकरी भरडला जाणार असून तो भूमिहीन होईल. यामुळे सांगलीतील 19 गावांचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचे म्हटले आहे.
सध्या या महामार्गावरून वाद सुरू असून क्षेत्र मोजणीच्या कामाला गती आली आहे. पण खरा वाद हा मोबदल्याचा असून शेतकरी समृद्धी महामार्गाप्रमाणे रेडिरेकनरच्या चारपचट मोबदला मागत आहेत. यामुळेच या महामार्गाला विरोध सुरू आहे. मात्र विरोध डावलून सरकारने हा महामार्ग पुढे रेटला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.