MVA News : जागावाटपात कोल्हापुरात काँग्रेस मोठा भाऊ; राष्ट्रवादी, ठाकरे गटाला प्रत्येकी दोन जागा

Political News : कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी मतदारसंघ मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांची स्पर्धा लागली आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kohlapur News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. एक ते दोन मतदारसंघ सोडल्यास बाकीच्या सर्व जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे धोरण ठरलेला आहे. कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी मतदारसंघ मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांची स्पर्धा लागली आहे.

ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा असे सूत्र ठरले असताना, कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात काँग्रेस (Congress) मोठा भाऊ ठरणार आहे. कारण जागा वाटपात काँग्रेसला सहा, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी दोन-दोन जागा असे सूत्र ठरले आहे. (MVA News)

कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील कोल्हापूर उत्तर, करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. यंदाच्या निवडणुकीत या चार जागांसह शिरोळ आणि इचलकरंजी हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे जातील. त्यामुळे दोन जागा बोनस काँग्रेसला मिळणार आहेत. तर राधानगरी आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडे जाणार आहे. चंदगड आणि कागल विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विद्यमान जागा असल्याने जागा सोडायची नाही, असा निर्धार काँग्रेसने केल्याने ही जागा काँग्रेस राहणार आहे. ‘इचलकरंजी’ व ‘शिरोळ’मध्ये राष्ट्रवादी शरद पवार असो किंवा शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ उमेदवारच नाही, त्यामुळे या दोन जागांचा बोनसही काँग्रेसला मिळणार आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Madhuri Misal : 'पर्वती मतदारसंघातून मीच लढणार', उमेदवारीवर माधुरी मिसाळ ठाम

उत्तरेत काँग्रेसकडून नवा चेहरा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोणता चेहरा समोर येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावरच महायुतीचा चेहरा अवलंबून आहे. काँग्रेसकडे उमेदवारीसाठी चुकांची रीघ लागली आहे. मात्र ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या पातळीवर ऐनवेळी रिंगणात ‘सरप्राईज’ चेहरा उतरला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणेच या मतदार संघातील संभाव्य उमेदवाराचा निर्णय मंगळवारी (ता. 15) होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Vinod Tawde : ठाकरेंवर संतापले अन् कॅबिनेटच्या निर्णयाने सुखावले! विनोद तावडेंना झाली वाजपेयींसह मुंडेंची आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com