

Solapur, 02 June : काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही असणारे पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी आपली सही बनावट असल्याचा आरोप केला आहे. ती आपली सही नसल्याचा आक्षेप भोसले यांनी छाननी वेळा केला आहे. फत्तेपूरकर यांच्या अर्जावर तीन वाजता सुनावणी होणार आहे, या सुनावनीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. या वेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली आहे, पक्षाकडून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे उमेदवार फत्तेपूरकर यांच्या अर्जावर पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांची सूचक म्हणून सही आहे. मात्र, छाननीच्या वेळी भोसले यांनी आक्षेप घेतला आहे.
फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आपण सही केलेली नाही, ती बनावट सही आहे, असा दावा नगरसेवक भोसले यांनी केला आहे. आता फत्तेपूरकर यांच्या अर्जावर तीन वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक रद्द करा : प्रणिती शिंदे
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस उमेदवाराचा अनुमोदक दबाव पोटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसचा खोटारडेपणा दिसायला लागला : कल्याणशेट्टी
काँग्रेसच्या उमेदवाराला सूचक मिळणंही मुश्किल होतं, त्यातला एका सूचकाची खोटी सही केली आहे, असा आरोप भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे. जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळली आहे की, त्यांच्याकडे सूचकासाठी माणसं नाहीत. काँग्रेसचा खोटारडेपणा लोकांना दिसायला लागला आहे, त्यामुळे त्यांचे आता नाटक सुरू झाले आहे, असा टोला कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.