Kolhapur News : काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उपनगरात असणाऱ्या आपटेनगर चौकातील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी या मार्गाचे उद्घाटन उरकण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या सहकार्यातून या स्मारकाचे उद्घाटन पार पडले. (Latets Marathi News)
कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक होणे अत्यंत गौरवास्पद बाब आहे. हे स्मारक पूर्ण होण्यासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांचा कृतज्ञता म्हणून सकल धनगर समाजाकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला. स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. तर श्रीमंत शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र आज स्मारकाची स्थिती अंधारमय झाली आहे. उद्घाटन समारंभ पार पडून पाच दिवस पूर्ण झाले आहेत. त्या ठिकाणी महापालिकेकडून कोणतीच लाईट व्यवस्था उपलब्ध करण्यात आली नाही. या स्मारकाचे उद्घाटन झाले खरे मात्र रात्रीच्या वेळेस हे स्मारक कशाचे आहे? हे विचारायची वेळ स्थानिकांसह पर्यटकांवर आली आहे. किमान स्मारकाच्या पुतळ्याशेजारी लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
महानगरपालिका आणि आमदार फंडातून या स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या त्या ठिकाणी कोणतेही काम शिल्लक नाही, अशी प्रतिक्रिया शहर अभियंता हर्षिजित घाटगे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापुरातील आपटे नगर परिसरात उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उदघाटन आज राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh), आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार ऍड. रामहरी रुपनवर, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजूबाबा आवळे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.