Loksabh Election 2024 : देशातील लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून, आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रसह कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघांत तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, माढा, सोलापूर, हातकणंगले, उस्मानाबाद, लातूर आणि रायगड या लोकसभा मतदारसंघांत सात मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित केली आहे. देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 जून रोजी या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील मतदान 20 एप्रिल आणि सात मे रोजी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे दुपारपासूनच आचारसंहितेची लगबग सुरू झाली.
देशातील 543 लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आज तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. महाराष्ट्रात ही रणधुमाळी 20 मे रोजी होणार असून, राज्यात पाच टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. देशात निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
देशात जवळपास 49 कोटी पुरुष, तर 47 कोटी महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार 7 मे तर चौथ्या टप्प्यात 13 मे, पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे तर सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे तर सातव्या टप्प्यातील मतदान 1 जुन रोजी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तिसऱ्या टप्प्यातील कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सांगलीसह 11 लोकसभा मतदारसंघांत पुढीलप्रमाणे मतदान प्रक्रियेच्या तारीख दिल्या गेल्या आहेत. नामनिर्देशन :-12 एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेणे :- 19 एप्रिल, उमेदवारी अर्ज छाननी :-20 एप्रिल, उमेदवारी अर्ज माघारी घेणे :- 22 एप्रिल, मतदान :-7 मे, मतमोजणी :-4 जून, निवडणूक प्रक्रिया समाप्ती :- 6 जून.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.