Sangli Lok Sabaha 2024 : सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेचे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?

Lok Sabha Election 2024 : पुढचे दोन आठवडे प्रचाराचा नुसता धुराळा उडणार आहे. यानिमित्ताने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते मतदारसंघात प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे.
Vishal Patil-Chandrahar Patil-Sanjay Patil
Vishal Patil-Chandrahar Patil-Sanjay PatilSarkarnama

Sangli, 23 April : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून भाजपचे खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे हे रिंगणात आहेत. त्यामुळे पुढचे दोन आठवडे प्रचाराचा नुसता धुराळा उडणार आहे. यानिमित्ताने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते मतदारसंघात प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे.

सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे. तोवर उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. मात्र, संजय पाटील (Sanjay Patil), चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. या तिघांनीही बैठका आणि भेटीगाठींवर भर दिलेला आहे. आगामी पंधरा दिवसांत मात्र राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेते प्रचार सभांचा फड गाजवणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishal Patil-Chandrahar Patil-Sanjay Patil
Sambhjinagar Constituency : संभाजीनगरात विनोद पाटील भुमरेंशी खेटले, मुख्यमंत्र्यांवर पुन्हा उमेदवार बदलण्याची नामुष्की का?

मोदी नाही तर योगी-शाहांच्या सभेसाठी प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संजय पाचाटील यांच्यासाठी सांगलीत सभा होणार होती. मात्र, मोदींची सभा कराडला घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे मोदींची सांगलीत सभा होण्याची शक्यता मावळली आहे. नरेंद्र मोदी यांची वेळ मिळणार नसेल तर किमान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा घेतली जाऊ शकते.

ठाकरे-पवार-पाटीलही लावणार जोर

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत एक सभा घेतली आहे. आता पुन्हा एकदा ते सांगलीत येण्याची शक्यता आहे. तसेच, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. सांगलीत संजय राऊतांनी दोन-चार दिवस तळ ठोकून आढावा घेतला होता. यासोबत राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील हे सांगलीत काय प्रचारयंत्रणा राबवितात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Vishal Patil-Chandrahar Patil-Sanjay Patil
Hatkanangle Lok Sabha : शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त

विश्वजित कदम, विक्रम सावंतांच्या भूमिकेकडे लक्ष

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे सांगलीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेले काँग्रेसचे नेते चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रचारात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही सांगली आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे काँग्रेसचे दोन आमदार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.

आंबेडकर, तांबे विशाल पाटलांसाठी सभा घेणार का?

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, दुसरे एक काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजित तांबे यांनीही विशाल यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

R

Vishal Patil-Chandrahar Patil-Sanjay Patil
Mohol Politics : फडणवीसांचा निकटवर्तीय भाजप नेता बुधवारी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com