Congress Solapur : काँग्रेसचे मराठा, धनगर अन्‌ लिंगायत कार्ड : सोलापुरात दोन जिल्हाध्यक्ष अन्‌ एक शहराध्यक्षाची नियुक्ती

Congress appoints Solapur district president : काँग्रेसने सोलापूर आणि माढासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करत मराठा, धनगर आणि लिंगायत समाजाचे राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
Solapur Congress organizational appointments
Solapur Congress organizational appointmentsSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 May : काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यात एक शहराध्यक्ष आणि दोन जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. सोलापूर आणि माढा लेाकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र दोन जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर शहराध्यक्ष नेमताना काँग्रेस पक्षाने मराठा, धनगर आणि लिंगायत हे समाजिक समीकरणही साधले आहे. दुसरीकडे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना बदलण्याची मागणी असूनही पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात सोलापूरच्या (Solapur) दोन जिल्हाध्यक्ष आणि एका शहराध्यक्षचा समावेश आहे. सोलापूरच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची फेरनिवड, तर पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप साठे यांना संधी देण्यात आली आहे.

सोलापूर काँग्रेस (Congress) शहराध्यक्षपदी चेतन नरोटे यांना कायम ठेवण्यात आले आहे. नरोटे यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. नरोटे यांना बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा नरोटे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. नरोटे यांच्या निवडीने पक्षाने धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणारे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर या तालुक्यांबरोबरच बार्शीचीही जबाबदारी विद्यमान जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्याकडे पुन्हा देण्यात आली आहे. शटगार यांना नुकतीच जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली होती.

Solapur Congress organizational appointments
MLC Election : नाशिक विधानपरिषदेत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी 'मविआ'ची तयारी ; इस्लाम, समाजवादी पार्टीला सोबत घेण्याच्या हालचाली

शटगार यांच्या रुपाने जिल्ह्यातील बहुतांश लिंगायत समाजाला पक्षासोबत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत आणि धनगर समाज निर्णायक मानला जातो. या दोन्ही समाजाला काँग्रेस पक्षाने प्रतिनिधीत्व दिले आहे, त्यामुळे त्यांचा किती फायदा होतो, हे आगामी निवडणुकीत दिसून येणार आहे.

सोलापूर पश्चिम विभागाच्या (माढा लोकसभा मतदारसंघ) जिल्हाध्यक्षपदी संदीप साठे यांना संधी देण्यात आली आहे. माढ्यातील काँग्रेसचे नेते (स्व.) गणपतराव साठे यांचे नातू असलेल्या संदीप साठे यांच्याकडे पक्षाची कमान सोपवून काँग्रेसने निष्ठावंताला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Solapur Congress organizational appointments
Cockroach Janata Party latest update : 'कॉकरोच जनता पार्टी'चा सोशल मीडियावर धुमाकूळ! कोट्यवधींचा टप्पा पार करत भाजपलाही टाकले मागे; 5 दिवसांत फॉलोअर्सचा पाऊस

माजी आमदार धनाजी साठे यांचे संदीप हे पुतणे आहेत. त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पक्ष जीवंत ठेवण्याचे मोठे जिकिरीचे काम नरोटे, शटगार यांना पार पाडावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com