CPR Hospital : 'लाल डायरी' कांड भोवलं! कोल्हापूरच्या आजी-माजी सिव्हील सर्जनला घरचा रस्ता : शिवसैनिकाने केला घोटाळ्याचा भांडाफोड

CPR Hospital : सीपीआर रुग्णालयातील लाल डायरी प्रकरणात दोषी आढळल्याने डॉ. प्रशांत वाडीकर आणि डॉ. सुप्रिया देशमुख यांना निलंबित करण्यात आले असून आरोग्य विभागाने कारवाई केली आहे.
Doctors at CPR Hospital suspended after inquiry into the controversial ‘red diary’ case, raising serious questions over hospital administration and accountability.
Doctors at CPR Hospital suspended after inquiry into the controversial ‘red diary’ case, raising serious questions over hospital administration and accountability.
Published on
Updated on

CPR Hospital : सीपीआरमधील लाल डायरीप्रकरणी चौकशीत दोषी असल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर व तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी (10 एप्रिल) रात्री उशिरा सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी नील कुमेरिये यांनी काढले.

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिले मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण होते, या विषयावर आंदोलन केले होते. यावेळी शल्यचिकित्सक कार्यालयातच लाल रंगाची डायरी सापडली होती. या डायरीत काही रक्कम व त्यासमोर काही डॉक्टरांची नावे लिहिली होती.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या डायरीतील नोंदीत रकमा कोणत्या व्यवहाराच्या आहेत, अशी विचारणा केली होती. तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या रकमांविषयी संभ्रम निर्माण झाला होता. पुढे या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. यानंतर 3 सदस्यीय चौकशी समिती नेमली होती.

Doctors at CPR Hospital suspended after inquiry into the controversial ‘red diary’ case, raising serious questions over hospital administration and accountability.
Maharashtra Government : रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी : 'तर' परवाना रद्द करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

या समितीनेच १५ दिवस शल्यचिकित्सक कार्यालयातील आर्थिक व्यवहारांच्या फायली तपासल्या होत्या. काही नोंदी शासकीय नियमानुसार नसल्याचे स्पष्ट झाले होते. या नोंदी करण्याचे काम ज्यांच्याकडे होते, त्यांनी ते अन्य दोन कक्ष सेवकांकडून करून घेतले होते. तसेच एक चतुर्थश्रेणी कर्मचारीही त्यांना साहाय्य करत असल्याचे चौकशीतून समोर आले; मात्र, अंतिम जबाबदारी दोन्ही शल्यचिकित्सकांची होती. त्यामुळे त्यांना जबाबदार धरून कारवाई झाली.

Doctors at CPR Hospital suspended after inquiry into the controversial ‘red diary’ case, raising serious questions over hospital administration and accountability.
Maharashtra Politics Live : धक्कादायक! अकोला पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला

कक्ष सेवकांच्या बदलीची शिफारस

याप्रकरणातील दोन कक्षसेवकांची बदली करण्याची शिफारस चौकशी समितीने अहवालात केली होती. त्यानुसार आरोग्य उपसंचालक पातळीवर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच अन्य एका कर्मचाऱ्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com