Hasan Mushrif : सायबर गुन्हेगारांची नजर मंत्री मुश्रीफांवर; बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन 'ही' गोष्ट केली व्हायरल

Kolhapur Cyber Crime : ..या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : अलिकडच्या काळात बनावट फेसबुक अकाउंट तयार करून सायबर गुन्हेगारांनी सुळसुळाट केला आहे. त्यांना लगाम लावणे कठीण बनले आहे. पण याच सायबर गुन्हेगारांनी आता राज्यातील मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्ते आणि मुलांना टार्गेट केले आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचं सकाळीच फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. हे प्रकरण ताजे असताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक आयडी काढले असल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) आपले लक्ष वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना बनवले आहे. त्यांच्या नावाने फेसबुक वर बनावट अकाउंट काढत त्यांच्या ओरिजनल अकाउंट वरून मजकूर कॉपी केला आहे. ओरिजनल अकाउंटवरील मजकूर कॉपी करून बनावट अकाउंटवरून मजकूर व्हायरल होत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Hasan Mushrif
Kapil Patil : ...तर विरोधकांनी चष्मा बदलावा, कपिल पाटलांचा खोचक सल्ला

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे दैनंदिन कामकाजाची माहिती आपल्या फेसबुक अकाउंट वरून कार्यकर्त्यांना देत असतात. शिवाय मेळावे किंवा पत्रकार परिषद फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत असतात. याचा फायदा उचलत सायबर गुन्हेगाराने त्यांच्या नावाने फेसबुक बनावट अकाउंट काढून संबंधित लाईव्ह व्हिडिओ व्हायरल केले आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांशी चॅटिंग ही केले आहे.(Police News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान या सर्व प्रकरणानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ याचे सोशल मीडिया हँडल करणारे सुशांत बाळासाहेब डोंगळे यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञाता विरोधात कागल पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Hasan Mushrif
Raosaheb Danve News : वंदे भारत... रावसाहेब दानवेंनी घडवली चारशे कार्यकर्त्यांना सुपरफास्ट सफर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com