

Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालात मंगळेवढा, दक्षिण सोलापूर आणि माळशिरस तालुक्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कौल दिला आहे. यातील मंगळवेढा आणि दक्षिणमध्ये सर्वच नेतेमंडळी आणि सत्तास्थाने भाजपकडे असूनही विरोधी उमेदवारीला मिळालेली आकडेवारी पक्षाला विचार करायला लावणारी आहे. दुसरीकडे, उत्तर सोलापूर, माढा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत फिल्डिंग लावूनही अदृश्य शक्तीने दणका दिल्याचे निवडणूक आकडेवारीतून स्पष्ट होते.
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या १९ जागांपैकी १८ जागा जिंकून भाजपने इतिहासात प्रथमच सत्ता मिळविली आहे. केंद्रापासून महापालिका आणि पंचायत समित्यांवर वर्चस्व असूनही भाजपला जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत स्वकीयांकडूनच दगाफटका झाल्याचे स्पष्ट होत आहे. पालकमंत्र्यांसारखे खमके नेतृत्व असूनही निवडणुकीत गडबड झाल्याचे दिसून येत आहे.
मंगळवेढ्यात आमदारपासून संचालकांपर्यंत सर्व भाजपचे नेते आहेत. विरोधात एकही मातब्बर नेता नसतानाही मोहिते पाटील यांच्या पॅनेलने तालुक्यात मतांची आघाडी घेतली आहे. महिला मतदारसंघात सत्ताधारी दोन्ही उमेदवारांना ४२ (२१+२१) मते पडली आहेत, तर विरोधी उमेदवारांना १७५ (९४+८१) मतं पडली आहेत. अनुसूचित जाती जमातीमध्ये भाजप उमेदवाराला १८, तर मोहिते पाटलांच्या उमेदवाराला ९६ मते मिळाली आहेत. भटक्या विमुक्त जमातीमध्ये भाजपला १५, तर विरोधी उमेदवारास ९९, पणनमध्ये फक्त रणजित शिंदेंना लीड दिले आहे. दूध संस्था आणि नागरी बॅंकांमध्येही विरोधी उमेदवारास मताधिक्य आहे.
दक्षिण सोलापूरमध्ये सत्ताधारी महिला उमेदवारांना ४३ (२३+२०), तर मोहिते पाटील पॅनेलला ६६+५९ अशी मतं मिळाली आहेत. अनुसूचित जाती जमातीमध्ये भाजप उमेदवाराला ३२, तर विरोधात ६६ मतं पडली आहेत. भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये भाजपला ३५, विरोधकांना ६३, तर रणजित शिंदे, साळुंखेंना मात्र सर्वच मते पडली आहेत. मात्र, बॅंक, पतसंस्था मतदारसंघात समसमान मते पडली आहेत. दक्षिणमध्ये सत्ताधारी नेतेमंडळींचा भरणा आहे, तरीही मोठ्या प्रमाणात क्राँस व्होटिंग झाले आहे.
उत्तर सोलापूरमध्ये ही भाजप आणि विरोध उमेदवारांना जवळपास सारखीच मतं पडली आहेत. यात महिलामध्ये सत्ताधारी उमेदवारांना १०७+१२६, तर विरोधकांना ९२+८४ मतं पडली आहेत. अनुसूचित जाती जमातीमध्ये भाजपला १२७, विरोधकांना १०२, भटक्य विमुक्त जाती जमातीमध्ये भाजपला ११९, तर विरोधकास १०९, पणनमध्ये भाजपला १, विरोधकास २, बॅंका-पतसंस्था मतदारसंघात भाजपला ६६, तर विरोधी उमेदवारास ९७ मते मिळाली आहेत.
माढ्यात सत्ताधारी महिला उमेदवारांना १६७+१७६, तर मोहिते पाटील पॅनेलला ११९+१३९ अशी मतं मिळाली आहेत. अनुसूचित जाती जमातीमध्ये भाजप उमेदवाराला १९१, तर विरोधात १२७ मतं पडली आहेत. भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये भाजपला १७१, विरोधकांना १४५, तर पणनमध्ये भाजपला १८, तर विरोधकास ०, दूध संस्थांमध्ये भाजपला ४५, विरोधकास ३४, नागरी बॅंकांमध्ये भाजपला ३७, तर विरोधकास १३ मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.