

Solapur, 27 November : ज्यांनी सोलापुरातील सहकार बुडवला, बॅंक बुडवली, अशा लोकांनी पॅनेल टाकून आमच्या बापजाद्यांचं इथं प्रचंड वर्चस्व आहे. आमच्याशिवाय इथं काही घडूच शकत नाही, अशा अविर्भावात जनतेला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला. त्याला आमच्या पॅनेलमधील काही लोकांनी साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सर्व प्रयत्न नेस्तानाबूत झाले, असा गौप्यस्फोट पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या होत्या. ते सर्व भाजपचे नेते आहेत. उर्वरीत ९ जागांसाठी झालेल्या झालेल्या निवडणुकीत भाजपने ८ जागा जिंकल्या असून आहेत. त्यामुळे भाजपने जिल्हा बॅंकेच्या १९ पैकी १८ जागा मिळवित बॅंकेवर प्रथमच वर्चस्व मिळविले आहे. त्या विजयानंतर पालकमंत्री गोरे यांनी बॅंकेतील निवडणुकीतील घडामोडींवर भाष्य केले आहे.
ते म्हणाले, माळशिरस सोसायटी मतदारसंघाची अपवादात्मक एखादी सीट सोडली बाकीच्या १८ च्या १८ जागा भाजपच्या आलेल्या आहेत. मोहिते पाटील यांना आता थोड्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. स्वतःची आयडेंटी अख्खा जिल्ह्याने चोर म्हणून केलेली आहे.
ज्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकार चोरला. ज्यांनी सहकारातील अनेक बॅंकांमधील हजारो कोटी रुपये चोरले. ज्यांनी संस्थाच संस्था खाल्ल्या. अशा लोकांनी पुन्हा राजकारणात येऊन साधन सुचितेच्या गप्पा मारणे, हे उचित नाही. जनतेने त्यांना पाच वेळा जागा दाखवली आहे, असेही गोरे यांनी म्हटले आहे.
गोरे आणि मोहिते पाटील यांची ही निवडणूक नव्हती. ही निवडणूक शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनीची होती. शेतकऱ्यांची ही अर्थवाहिनी टिकली पाहिजे आणि मजबूत राहिली पाहिजे, हे महत्वाचं होतं. शेतकरी, सहकार या निवडणुकीत जिंकला आहे. कोण मोहिते पाटील आणि कोण गोरे हा विषय येत नाही. मोहिते पाटलांचा कार्यक्रम फार पूर्वी झालेला आहे. पुन्हा तो विषय येणार नाही, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.