Gore Vs Desai : गोरेंच्या इच्छेला शंभूराज देसाई लावणार सुरुंग : मुख्यमंत्री अन्‌ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हवाला देत सांगितला अधिकार...

Satara Guardian Minister Issue : जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या चर्चेवर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली. पालकमंत्री नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore-shambhuraj desai
Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore-shambhuraj desaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 17 August : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेली इच्छा मी तर ऐकलेली नाही. ग्रामविकास मंत्री गोरे यांचं काय वक्तव्य आहे, हे ऐकतो, बघतो जरा. ते काय बोलले आहेत. पण, कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, हा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या वेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी निर्णय घेतला होता आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिली होती, असे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सोलापूरमधील एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, अशी आपली इच्छा आहे आणि ती इच्छा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे विधान केले आहे, त्यावरून सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. त्यावर विद्यमान पालकमंत्री देसाई यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णयही आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघेच घेणार आहेत. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं, हे मला तरी उचित वाटत नाही. त्यामुळे साताऱ्याचा पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या संघर्षावर अजूनही पडदा पडला नाही का, यावर गोरे म्हणाले, माझ्यापुरता म्हणाल तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर त्यावेळी अधिवेशन चालू होतं. त्या वेळी फडणवीस यांच्या ॲंटी चेंबरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मी आणि मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली. त्या वेळी चर्चेमध्ये जे काही ठरलं. अंतर्गत चर्चेतील मुद्दे उघडपणे बोलायचे नसतात.

Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore-shambhuraj desai
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदी निवड होताच गिरीश महाजन म्हणाले : ‘मला आज पांडुरंग पावला...’

ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर भाष्य करताना जे झालं ते झालं. त्यावर आता पडदा पडलेला आहे. आम्ही महायुती म्हणून यापुढे एकत्र काम करणार आहोत, असे सांगितले आहे. हे तिघेही आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत. या तिघांनी बसून एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निर्णयपेक्षा वेगळं काही करणं, आम्हाला योग्य वाटत नाही.

Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore-shambhuraj desai
BJP MLA Threat Case : भाजप आमदाराला गोळ्या घालण्याची सुपारी देणारा आरोप म्हणतोय, ‘मी सहज बोललो...’

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनीही आम्हाला साताऱ्यात एकत्र काम करण्यास सांगितले आहे, त्यामुळे आम्ही माझ्या बाजूने तरी महायुती धर्म पाळण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com