

सातारा : सातारा Satara जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ wet drought जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्यावतीने Congress जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना हे निवेदन दिले.
काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव व कराड तालुक्यात परतीच्या पावसामुळे सुमारे ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सातारा, पाटण, जावली, वाई, फलटण आणि खंडाळा तालुक्यात परतीच्या पावसाने १५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काढणील आलेली पिके कुजून केली आहेत. तर पुराच्या पाण्यामुळे पिकेही वाहून गेली आहेत.
काही ठिकाणी जमीनही खरवडून गेली आहे. पाच तालुक्यात सर्वाधिक हानी असून कोरेगाव तालुक्यातील १८ गावांतील १२०.५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस, घेवडा, सोयाबीन, स्ट्रॉबेरी, भाजीपाला यांची हानी झाली आहे. तर खंडाळा, महाबळेश्वर, खटाव तालुक्यातील ४२ गावांतील ३२६ हेक्टरवरील कांदा, बटाटा, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यात २२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे कृषी खात्याने पंचनामे करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. तसेच हेक्टरी ७५ हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. या वेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, निवास थोरात, अच्युतराव खलाटे, प्रदेश महिला सचिव धनश्री महाडिक, मनीषा पाटील, नाजिम इनामदार, मनोज तपासे, जमीन खान, अन्वर पाशाखान, ॲड. श्रीकांत चव्हाण, मालन परळकर, माधुरी जाधव, जस्मिन खान, अमोल शिंदे, संभाजी उत्तेकर, विजय मोरे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.