Rupali Chakankar : हायकोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा वाद पेटला; चाकणकरांची 'ती' पोस्ट शेअर करत अंधारेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, 'लोकांना संधी तरी द्या...'

Sushma Andhare Targets Rupali Chakankar After Court Order : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात आता नवा ट्विस्ट आला असून सुषमा अंधारे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
Defamation Case; Sushma Andhare and Rupali Chakankar
Defamation Case; Sushma Andhare and Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सुषमा अंधारे, अंजली दमानिया, रुपाली ठोंबरे आणि आशा मिरगे यांच्यासह एकूण २६ प्रतिवादींना जाहीर नोटीस बजावत उत्तर देण्याचे कडक निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ जुलै रोजी होणार आहे.

एकीकडे कोर्टामध्ये ही लढाई सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा चाकणकरांना आपल्या पोस्टच्या माध्यमातून डिवचले आहे. त्यांनी, चाकणकर यांनी केलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक आपल्या सोबत असल्याच्या दाव्यावरून चिमटा काढला आहे. तसेच जर लोक तुमच्या सोबत असतलील तर त्यांना समर्थन देण्याची संधी का त्या देत नाहीत..? असा सवाल केला आहे.

चाकणकर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी सुनावणीदरम्यान रुपाली चाकणकर स्वतः न्यायालयात उपस्थित होत्या. अशोक खरात प्रकरणानंतर आपल्याविरोधात नियोजित पद्धतीने बदनामीची मोहीम राबवली गेल्याचा थेट आरोप चाकणकर यांनी केला आहे. त्यांनी, काही महिला नेत्या, विविध माध्यम संस्था आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांनी संगनमताने आपली प्रतिमा मलिन केल्याचा दावा करत थेट दिल्ली गाठली.

Defamation Case; Sushma Andhare and Rupali Chakankar
Rupali Chakankar : अशोक खरातवरील चित्रपटावर रुपाली चाकणकर संतापल्या ; 'दोन दिवसांत नोटीस पोहोचेल', दीपाली सय्यद यांना इशारा

खरात प्रकरणानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर करून चाकणकर यांचे मॉर्फ केलेले अश्लील व बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरवले गेले. अत्यंत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्याही यादरम्यान प्रसारित करण्यात आल्या असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं.

चाकणकर यांचे वकील ॲड. अश्वनी कुमार दुबे यांनी कोर्टात माहिती देताना सांगितले की, या मॉर्फ्ड व्हिडिओंना सोशल मीडियावर तब्बल ४.३ कोटी जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यातून त्यांच्या प्रतिमेला मोठी खीळ पोहोचवण्याचा पद्धतशीर कट रचला गेल्याचं कोर्टा सांगण्यात आलं. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सर्व २६ प्रतिवादींना नोटिसा धाडल्या आहेत.

न्यायालयाच्या या भूमिकेनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा पुनरुच्चार केला. ही लढाई केवळ राजकीय नसून स्वत:सह संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी असल्याचे त्यांनी भावुक होत सांगितले. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक आपल्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Defamation Case; Sushma Andhare and Rupali Chakankar
Rupali chakankar : 'सायलेंट' रुपाली चाकणकर दोन महिन्यांनंतर 'अ‍ॅक्शन' मोडवर : बदनामी केलेल्या महिलेचं नाव घेत थेट कोर्टातच खेचलं

आता हाच धागा पकडत सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांचा माध्यमांशी संवाद साधलेला व्हिडिओ शेअर करत चाकणकर यांना तुमच्या मागे महाराष्ट्राची जनता असेल तर कमेंट बॉक्स ओपन का? करत नाही असा सवाल केला आहे. या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाले, "महाराष्ट्रातील फार मोठी जनता माझ्यासोबत आहे असं चाकणकर या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत मग या आपला कमेंट बॉक्स ओपन का ठेवत नाही आणि लोकांना ते समर्थन देण्याची संधी का देत नाहीत..? असा सवाल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com