अहमदनगरमधील दुर्घटने प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशीची मागणी

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली आहे.
devendra Fadnavis
devendra FadnavisSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज मृत्यू झाला. ही आग शॉकसर्केटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे. Devendra Fadnavis demands inquiry in Ahmednagar accident case

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही वाहनाला अचानक आग लागली होती. या बाबत चौकशी सुरू असतानाच आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली.

devendra Fadnavis
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग : दहा रुग्णांचा मृत्यू

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अहमनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

devendra Fadnavis
तुम्ही मर्द आहात, तर थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा : अमृतावहिनी कडाडल्या!

घटनास्थळाला छावणीचे स्वरूप

घटना स्थळाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ आगरवाल, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, संपत शिंदे, शशिकुमार देशमुख आदी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मोठा पोलिस बंदोबस्त जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे.

हे नेते करणार घटनास्थळाची पाहणी

जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार हे आज तर ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या भेट देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com