Kolhapur | Ichalkaranji Municipal corporation
कोल्हापूर : जिल्ह्याला (Kolhapur) आणखी एक महापालिका मिळाली आहे. मॅनेंचस्टर सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी (Ichalkaranji Municipal corporation) नगरपरिषदेला आता महापालिकेचा दर्जा मिळाला असून त्याबाबतची अधिसूचना काल प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही महापालिका करताना शहराची हद्दाही वाढविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. इचलकरंजी ही राज्यातील २८ वी महानगरपालिका ठरली आहे. (Ichalkaranji Municipal corporation latest news)
इचलकरंजीला महापालिका होण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचा नगरविकास विभागाकडील पाठपुरावा महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. त्यांनीच काल संध्याकाळी अचानक या संदर्भातील आदेश दाखवत घोषणा केली आणि स्वपक्षासह इतर विरोधकांनाही बुचकळ्यात पाडले. वास्तविक मागील दहा वर्षांपासून इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वी धैर्यशील माने यांनी यात आघाडी घेत राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला. (Dhairyasheel Mane latest news)
मध्यंतरीच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी प्रस्ताव देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या शेवटच्या सभेत एकमुखी महापालिका करण्याचा ठराव घेण्यात आला होता. नगरपालिकेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर सर्व पक्षीय नेतेमंडळींनी याबाबतचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यावर सविस्तर प्रस्ताव देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने सर्वंकष अभ्यास करून प्रस्ताव तयार केला, आणि यानुसार महापालिकेची अधिसुचना मिळाली आहे.
प्रस्ताव चार, मंजुरी इचलकंरजीला
याशिवाय राज्यात एकूण चार शहरांमध्ये महापालिकेबाबतचे प्रस्ताव प्रलंबित होते. यामध्ये अंबरनाथ, यवतमाळ, जालना आणि इचलकरंजी या नगरपालिकांचा समावेश होता. पण त्यापैकी फक्त इचलकरंजी महापालिकेला राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी धैर्यशील माने यांचा राजकीय पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.