
वसंत कांबळे
Madha News : सोलापूर जिल्ह्यतील कुर्डु येथील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना लावलेल्या फोन रेकॉर्ड व्हायरलवरुन महसूल प्रशासनानं दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या व माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी कुर्डू गावची तुलना बीडबरोबर करुन गावाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ व इतर मागण्यांसाठी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
माढा तालुक्यातील शिवाजी चौकात हजारोंनी शुक्रवारी (ता.12) सकाळी नऊ वाजता शिवाजी चौकात हजारोंनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आपण बंद कशासाठी करत आहोत हे सांगितले.
बेंद ओढ्यात पाणी सुटलेच पाहिजे, गावातील सर्व पानंद रस्ते झालेच पाहिजेत, दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेतलेच पाहिजे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर निषेध असो, यांसारख्या घोषणांनी मोठ्या आवाजात शिवाजी चौकात दणाणून सोडण्यात आला.
यावेळी संपूर्ण गावातील मेडिकल अत्यावश्यक सेवा, पतसंस्था,दवाखाने व्यतिरिक्त बाकीचे एकही दुकान दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे कुर्डू गावचे असणारी लाखोंची उलाढाल एक दिवसासाठी ठप्प झाली. आता याप्रकरणी सोमवारी काढण्यात येणाऱ्या बांगडी मोर्चाऐवजी महिलांचा अवमान होऊ नये, यासाठी घंटानाद व हलगी मोर्चा काढणार असल्याचे यावेळी माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी सांगितले.
माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे म्हणाले, कुणी जर माझ्या गावाला चुकीची उपमा देणार असतील, पण खासदारांन त्यांच्या घरी त्यांनी केलेल्या आरोपांमधला एकही प्रकार आमच्या गावात घडलेला नाही. आमच्या गावाला बीडची (Beed) उपमा देऊन बदनामी केली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये कोणाचे कोणाचे सुपारी देऊन खून केली याची यादीही माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी वाचली. दादा तांबोळी ,आजबे देवकर ,सागर मोहिते, जवळपास 16 ते 17 युवकांचे खून सुपारी देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हेच सोलापूर जिल्ह्याचे खरे वाल्मिक कराड आहेत असा हल्लाबोलही ढाणेंनी यावेळी केला.
यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आपण बंद कशासाठी करत आहोत हे सांगितले. यावेळी आण्णासाहेब ढाणे,रवी नरखेडकर, संतोष कापरे, नितिन जगताप, कैलास जाधव,बाबा जगताप, श्रीकांत जगताप, विशाल माळी, नितिन माळी, बंडू जगताप यांच्यासह हजारो ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी जोरदार तोफ डागली होती. मोहिते पाटील यांनी या सर्व प्रकारावर बोलताना कुर्डू गावची परिस्थिती तर बीडपेक्षा भयानक असल्याचा आरोप केला आहे. या गावात मुरूम माफियांची मोठ्या प्रमाणात दहशत असून सरकारी जागेतील व मुंबई पुण्याला जगायला गेलेल्या गोरगरीब आणि दलित शेतकऱ्यांच्या शेतातील कोट्यवधी रुपयाचा मुरूम या माफियांनी उचलल्याचा आरोपही मोहिते पाटील यांनी केला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनलं आहे. या प्रकरणी आता कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडिराम पवार या दोघांविरोधात मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच आणि ग्रामसेवकाने मिळून मुरुम उपसा केल्याची तक्रार गावच्या तलाठी प्रिती शिंदेंनी पोलिसांत दिली.
या तक्रारीनंतर केलेल्या तपासात कुर्डू येथे तहसीलदारांची किंवा इतर कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीर मुरुम उपसल्याचं उघडकीस आलं आहे. तर बेकायदेशीर मुरूम उपसा केला जात असल्यामुळेच ती कारवाई रोखण्यासाठी आयपीएस अंजना कृष्णा त्या ठिकाणी गेल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.