Patan News : शहाजीबापूंची डायलॉगबाजी; त्यावेळी तुमचा मणका कुठ गेला होता...

Eknath Shinde दौलतनगर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलीकॉप्टर बिघडल्यामुळे ते तब्बल अडीच तास उशीरा कार्यक्रम स्थळी आले.
Shahajibapu Patil, Udhav Thackeray
Shahajibapu Patil, Udhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Patan News : काय डोंगार, काय झाडी, सगळं कस एकदम ओकेच, अशी डायलॉगबाजी करत आमदार शहाजीबापू पाटील यांनी दौलतनगरला उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यांना भाषण करायला लावल्याने उपस्थितांनी ते भाषणासाठी उठताच टाळ्यांचा कडकडाट केला.

दौलतनगर येथे मुख्यमंत्री शिंदे EKnath shinde यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलीकॉप्टर बिघडल्यामुळे ते तब्बल अडीच तास उशीरा कार्यक्रम स्थळी आले. या कार्यक्रमाठी उपस्थित मान्यवरांची भाषणे थांबवुन फक्त मुख्यमंत्री, पालकमंत्री शंभुराज देसाई shambhuraj Desai, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीच भाषणे ठेवण्यात आली होती.

मात्र पालकमंत्री देसाई यांच्या भाषणानंतर निवेदकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव पुकारत असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवुन आमदार शहाजीबापु पाटील यांना बोलण्यास सांगितले. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. उध्दव साहेब अडीच वर्षे तुमची तब्बेत चांगली नव्हती, तुम्ही घरात बसला आणि गुवाहटीला गेल्यावर तुम्ही उठुन बसला. त्यावेळी मणका कुठ गेला होता, अशी टिप्पणी आमदार पाटील यांनी केली.

Shahajibapu Patil, Udhav Thackeray
Patan News : स्वत:चे घर जळतंय, त्याकडे लक्ष द्या...एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

ते म्हणाले, खेड्यात 'अंगात' येणाऱ्या बायका असतात. त्या 'अंगात' येणाऱ्या बाईच्या बटव्यातील एक रुपया खाली पडल्यावर बटव्यातील एक रुपयाही आहे, तोही जाईल, असा विचार करुन त्या एक रुपयावर पाय देते. तसेच राज्यातील सरकारचे झाले आहे. निकालाचा रुपया मुख्यमंत्री शिंदे यांनी उचलला आणि जय महाराष्ट्र म्हणुन सरकार आणले. निकाल लागला कर्नाटकचा आणि संजय राऊत उडी मारताहेत इकडे. पोरग कुठं झालय आणि बारश्याची तयारी कोण करतंय, असले राजकारण झाले आहे.उठायच आणि शिव्या द्यायच्या एवढाच उद्योग त्यांचा सुरु आहे.

Shahajibapu Patil, Udhav Thackeray
Karnataka Election Result : मागील वेळापेक्षा 56 जागा अधिक; काँग्रेसचा कसा चढत गेला आलेख?

मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलादी नेतृत्व असुन त्यांच्यामागे आम्ही ४० बाजीगर आमदार उभे आहोत. आम्ही गुवाहाटीला जातानाच आमदारकी सोडुन गेलो होतो, आम्हाला त्याची भिती कशाला घालताय ? जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्यानंतर सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. डोंगर, झाडी याने मला राज्यातुन फोन येतात. फोनमुळे माझा मेंदु फुटायला लागल्यासारखे झाले आहे.

Shahajibapu Patil, Udhav Thackeray
Devendra Fadanvis : काहीजण दुसऱ्याच्या घरात पोरगा झाला म्हणून आनंदी | Congress | Sarkarnama

अजित पवारांवर बोचरी टीका

अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे बाशिंग घेवुन फिरत आहेत. त्यांना नवरी काय भेटायला तयार नाही आणि हे बाशिंग काय ठेवायला तयार नाहीत, अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर करुन ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अडीच वर्षात केवळ अडीच कोटी रूपये मुख्यमंत्री निधीतुन रुग्णांना दिले. मात्र एकनाथ शिंदे यांनी दहा महिन्यात ६७ कोटींचे वाटप केले. गरीबांची कणव असलेले मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृ्त्व आहे.

Shahajibapu Patil, Udhav Thackeray
Satara News : तो तर उद्धव ठाकरेंचा मुर्खपणा; मुख्यमंत्री पदासाठी पवारांचा हात धरला : राणेंचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com