Dilip Mane : ‘टायगर अभी जिंदा है...!’ म्हणत दक्षिण सोलापूरमध्ये दिलीप मानेंचे बंडखोरीचे संकेत

South Solapur Constituency : सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत, त्यामुळे मी कुठं कुठं किती उमेदवार उभं करु शकतो, विचार करा, असे आव्हान दिलीप माने यांनी दिले.
Dilip Mane
Dilip ManeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 October : दक्षिण सोलापूर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि सोलापूर काँग्रेसमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले माजी आमदार दिलीप माने यांनी आज आक्रमक शैलीत भाषण करत बंडखोरीचे संकेत दिले. ‘माझ्या बापाने 1967 ला बंडखोरी केली अन्‌ आमदार झाले. आम्ही काय बंडखोरीच करायची का?’ असा सवाल करत अकरा ठिकाणी बंडखोर उभे करण्याचे सूतोवाच माने यांनी केले.

माजी आमदार दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (South Solapur Constituency) निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा मतदारसंघच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्याने माने यांच्यासह काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

दिलीप माने (Dilip Mane) यांच्या निवासस्थानी समर्थकांची आज बैठक झाली, त्या बैठकीत कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरीफ शेख, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे हे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात दिलीप माने यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

दिलीप माने म्हणाले, प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी दिवसरात्र आपण प्रचार केला. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा डाग आपण प्रणिती शिंदे यांच्या विजयाने धुवून काढला. सर्व सर्वेमध्ये आपण कुठेही मागे नाही, आपल्या प्रतिस्पर्धी आणि आपल्यात 25 टक्क्याचा फरक आहे. त्यात एक नंबरला दिलीप माने आहेत.

Dilip Mane
Barshi Politic's : दिलीप सोपल अर्ज भरून प्रचाराला लागले; राजेंद्र राऊतांची उमेदवारी कुठे अडली?

आपल्या मित्र पक्षाचा सर्वे झाला की नाही ते माहिती नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा सर्वे झालाय का, हे पहिले पाहिजे. माझ्या बापाने 1967 मध्ये बंडखोरी केली आणि आमदार झाले. मी 20014-19 या काळात दुसऱ्या पक्षात गेलो; पण तिथं रमलो नाही. आम्ही काय कायम बंडखोरीच करायची का..? असा सवाल माने यांनी विचारला.

मला आमदाराकीचे तिकीट मिळाले तर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात येईल. आपल्या मित्र पक्षाला तिकीट दिलं तर ती निवडून येणारी जागा आहे का...? सत्तेच्या माध्यमातून त्रास देणं सुरू आहे, तरीही मी सर्व ग्रामपंचायतींना साथ दिली आहे. बूथपासून आपण तयारी केली आहे. दक्षिण सोलापुरात 3 लाख 80000 मतदान आहे, त्यामुळे इथे भाजपला आणायचं आहे की काँग्रेसला आणायचं आहे.?

मी 2014 मध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली आहे, त्यामुळे त्यांना कसं पराभूत करायचं हे मला माहिती आहे. जनतेने ठरवलं आहे, आता बदल घडवायचा आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत, त्यामुळे मी कुठं कुठं किती उमेदवार उभं करु शकतो, विचार करा, असे आव्हान दिलीप माने यांनी दिले.

हा माझा अपमान नाही, तर तुमचा आहे. मालकांचं (दिलीप माने) कसं होईल; म्हणून लोक रडतायत. पण, आपण 29 तारखेला फॉर्म भरुयात. मी किती सहन करू, आता फक्त दक्षिण नाही, कुठं कुठं अर्ज भरायचा ते मी ठरवतो, असे सांगून दक्षिण सोलापूरमधून दिलीप माने यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

Dilip Mane
Malshiras Constituency : उत्तम जानकर, राम सातपुते ‘वेटिंग’वर; महायुती-महाआघाडीने वाढविला माळशिरसचा सस्पेन्स

वाघ म्हातारा झाला तरी... शिकार करायची सोडत नाही, त्यामुळे टायगर अभी जिंदा है. सोलापूरच्या लोकांना संयम माहिती आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि तीच आता निर्णय घेणार आहे. ही निवडणूक आता आर नाही तर पार राहील. आज जो तुमचा उत्साह आहे तो कायम राहू द्या, असे आवाहनही दिलीप माने यांनी केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com