Dudh Pandhari : रणजितसिंह शिंदेंनी वार्षिक सभेपूर्वी संचालकांना घडविला गुजरात दौरा!

दूध पंढरीची मंगळवारी वार्षिक सभा; चेअरमन शिंदे यांचा हा सुसाट कारभार काही संचालकांना एकतर्फी वाटू लागला आहे.
Dudh Pamdhari-Ranjitsinh Shinde
Dudh Pamdhari-Ranjitsinh ShindeSarkarnama

सोलापूर : सोलापूर (solapur) जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी, Dudh Pandhari) संचालकांनी नुकताच गुजरात (Gujrat) दौरा केला. अमूल, बनासकाठा या मोठ्या दूध संघाची पाहणी करण्यासाठी संचालक मंडळ २० ते २३ सप्टेंबर दरम्यान गुजरातच्या दौऱ्यावर होते. रणजितसिंह शिंदे (ranjitsinh shinde) यांच्याकडे चेअरमनपद आल्यापासून दूध संघाच्या संचालक मंडळात असलेले रुसवे-फुगवे या दौऱ्याच्या माध्यमातून धुवून गेल्याचे सांगितले जात आहे. दूध संघाची वार्षिक सभा येत्या मंगळवारी (ता. २७) दुपारी एक वाजता सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सभागृहात होणार आहे. या सभेपूर्वी जिल्हा दूध संघाच्या संचालकांना रिफ्रेश करण्यात आले आहे. (Director of Solapur District Dudh Sangh Visited 'Amul')

Dudh Pamdhari-Ranjitsinh Shinde
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

दूध संघाचे तत्कालिन चेअरमन, माजी आमदार दिलीप माने यांचे संचालक मंडळ बरखास्त करून या दूध संघावर प्रशासक व नंतर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले होते. साधारणतः सहा ते सात महिन्यांपूर्वी दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि या दूध संघावर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकहाती सत्ता मिळविली. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्याकडे दूध संघाच्या चेअरमनपदाची धुरा आली आहे.

Dudh Pamdhari-Ranjitsinh Shinde
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का : पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

चेअरमन शिंदे यांनी दूध संघाचा कारभार स्वीकारल्यापासून प्रत्येक बारीक-सारिक बाबींमध्ये लक्ष घातले आहे. दूध संघाची वितरण व्यवस्था, दूध संकलन व गुणवत्ता तपासणीत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ची यंत्रणाही युद्ध पातळीवर कामाला लावली आहे. चेअरमन शिंदे यांचा हा सुसाट कारभार काही संचालकांना एकतर्फी वाटू लागला आहे. दूध संघात नव्याने घेण्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त वेतन दिले जात असल्याने हा मुद्दा काही जणांना खटकू लागला आहे.

Dudh Pamdhari-Ranjitsinh Shinde
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दूध संघ बचाव समितीने आव्हान दिले होते. अधून-मधून बचाव समितीच्या माध्यमातून दूध संघाच्या कारभारावर बोट ठेवले जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २७) होणाऱ्या वार्षिक सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com