उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का : पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राहत असलेल्या नंदनवन या शासकीय निवास स्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
Vaibhav Sankhye-Eknath Shinde
Vaibhav Sankhye-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) पालघरचे (Palghar) जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज (ता. २४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. संख्ये, पाटील आणि शिवसैनिकांच्या पक्षांतरामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना अडचणीत सापडली आहे. (Palghar Shiv Sena district chief joins Eknath Shinde Group)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राहत असलेल्या नंदनवन या शासकीय निवास स्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. या नेत्यांनी आपला पाठिंबा शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

Vaibhav Sankhye-Eknath Shinde
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील आणि शिवसैनिकांना राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी आगामी काळात जिल्ह्यात कार्यरत राहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली.

Vaibhav Sankhye-Eknath Shinde
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

वैभव संख्ये यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला पाठींबा देणे, हा पालघर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट करणारी ही घटना आहे. या प्रसंगी युवा सेनेचे विस्तारक राहुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.

Vaibhav Sankhye-Eknath Shinde
खडसे-शहांच्या भेटीच्या चर्चेत नवा ट्विस्ट; आता पवारांच्या उपस्थितीत खडसे शहांना भेटणार!

आमागी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख्ये यांच्या निर्णयाचा परिणाम शिवसेनेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिंदे गटाला उभारी देणारा हा निर्णय ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com